शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय चलनी नोटांवर गांधीजीच राहणार!

By admin | Updated: December 6, 2014 02:56 IST

भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय अन्य कुणा राष्ट्रीय पुरुषाचे चित्र छापण्यास रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने नकार दिला आहे.

नवी दिल्ली : भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय अन्य कुणा राष्ट्रीय पुरुषाचे चित्र छापण्यास रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने नकार दिला आहे. राष्ट्रपित्याशिवाय अन्य कोणत्याही महापुरुषाचे व्यक्तिमत्त्व भारतीय मूल्य परंपरांचे इतके चपखल प्रतिनिधित्व करू शकत नाही, असा निर्वाळा या समितीने दिला आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. जेटली यांनी सांगितले की, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय इतरही राष्ट्रपुरुषांची चित्रे छापण्यात यावीत, अशी मागणी केंद्र सरकारकडे विविध पातळ््यांवरून होत होती. या मुद्द्यावर साकल्याने विचारमंथन करण्याचा सल्ला केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला दिला होता. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने आॅक्टोबर २०१० मध्ये एक समिती गठीत केली होती. भविष्यात चलनी नोटांचे डिझाइन कसे असावे, यावर समितीने विचार केला. महात्मा गांधी यांच्याशिवाय इतर महापुरुषांची चित्रे नोटांवर छापता येऊ शकतात का, यावर समितीने सखोल चर्चा केली. चर्चेअंती समितीने सध्याचे डिझाइन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.