शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन हॉटेल्सवर गजराज

By admin | Updated: October 14, 2016 00:54 IST

व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या तीन लब्धप्रतिष्ठितांवर गुरुवारी कारवाईचा दंडुका उगारण्यात आला.

कारवाईला सुरुवात : अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणलेअमरावती : व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या तीन लब्धप्रतिष्ठितांवर गुरुवारी कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. बडनेरा मार्गावरील हॉटेल सेव्हन पीएम, हॉटेल लजीज आणि श्री ट्रेडिंग कंपनीने पार्किंगच्या ठिकाणी केलेले अनधिकृत बांधकाम गुरूवारी जमीनदोस्त करण्यात आले. गुरूवारपासून म्हणजे १३ आॅक्टोबरपासून सुरू झालेली ही मोहीम २२ संकुलधारकांवरील कारवाई पूर्ण होईपर्यंत अव्याहत सुरू राहील, अशी माहिती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. ज्या २२ संकुलांमधील पार्किंगच्याठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले त्यात हमालपुरा झोनमधील ६, बडनेरा झोनमधील ५ आणि भाजीबाजार झोनमधील ११ संकुलांचा समावेश आहे. आयुक्त हेमंत पवार यांनी सहायक संचालक नगररचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या प्रमुखांना पार्किंगच्या ठिकाणी केलेल्या अनधिकृत बांधकामावर गजराज फिरविण्याचे आदेश दिले होते. यानुसार गुरूवारी सकाळी १० वाजता गणेश कुत्तरमारे पथकासह पोहोचले व कारवाईला सुरूवात झाली. यादरम्यान काहींनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करून महापालिकेच्या या कारवाईला विरोध केला. शुक्रवारीही होणार कारवाईअमरावती : विरोधाला न जुमानता बडनेरा मार्गावरील हॉटेल सेव्हन पीएम, हॉटेल लजीज आणि श्री ट्रेडिंग कंपनीचे अतिक्रमण महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले.हॉटेल सेव्हन पीएममध्ये तब्बल ३ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम करून पार्किंगची जागा हडपण्यात आली होती. कारवाईदरम्यान शौचालय, बाथरुम आणि गोदाम तोडण्यात आले. बडनेरा मार्गावरील श्री ट्रेडिंग कंपनीने पार्किंगच्या जागेवरील सुमारे ४०० चौरस फुट अवैध बांधकाम करून अतिक्रमण केले होते. त्यावर महापालिकेने गजराज फिरविला आहे. याशिवाय लजीज हॉटेलवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारीदेखील ही कारवाई केली जाणार आहे. कारवाईत बडनेरा झोनचे सहायक अभियंता नितीन बोबडे, नितीन भटकर, प्रवीण इंगोले, उमेश सवाई, पीएसआय विजय चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे. उर्वरित अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी महापालिकेचा गजराज चालविला जाणार आहे.