शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
5
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
6
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
7
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
8
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
9
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
11
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
12
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
13
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
14
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
15
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
16
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
17
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
18
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
19
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
20
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
Daily Top 2Weekly Top 5

दौंड रेल्वे अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार ----------------------

By admin | Updated: May 4, 2014 23:54 IST

पाथर्डी (जि. अहमदनगर): शनिवारी दौंड येथे रेल्वे-ट्रॅक्टर अपघातात तालुक्यातील तीन उसतोडणी मजुरांचा जागीच मृत्यू झाला व २२ जण गंभीर जखमी झाले़ मृतांवर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले़

पाथर्डी (जि. अहमदनगर): शनिवारी दौंड येथे रेल्वे-ट्रॅक्टर अपघातात तालुक्यातील तीन उसतोडणी मजुरांचा जागीच मृत्यू झाला व २२ जण गंभीर जखमी झाले़ मृतांवर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले़
शनिवारी (दि़ ३) तालुक्यातील तांबेवाडी व मंचरवाडी येथील ऊस तोडणी मजूर ट्रॅक्टरमधून गावाकडे येते होते़ दौंड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक पार करीत असतानाच दुरांतो एक्सप्रेसने या ट्रॅक्टरला धडक दिली़ या अपघातात तांबेवाडी येथील कारभारी महारनोर व इंदुबाई हंडाळ तर मंचरवाडी येथील ताईबाई बर्डे हे तीन ऊस तोडणी कामगार मृत्युमुखी पडले तर २२ मजूर गंभीर जखमी झाले. ही माहिती कळाल्यानंतर तालुक्यावर शोककळा पसरली़ तांबेवाडी व मंचरवाडीतील अबालवृद्धांना सुरुवातीला काही कळू दिले नाही़ परंतु रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सायरन वाजवित रुग्णवाहिकांनी गावात प्रवेश केला आणि अबालवृद्धांनी हंबरडा फोडला़ लहानग्यांना समजावताना ग्रामस्थांना अश्रू लपविता आले नाहीत़ शोकाकुल वातावरणातच रात्री दहाच्या सुमारास तांबेवाडी व मंचरवाडी येथे मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाथर्डी तालुका हा उसतोड मजुरांचा तालुका म्हणून परिचित आहे. तालुक्यातील सुमारे चाळीस ते पन्नास हजार मजूर दरवर्षी टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीसाठी राज्यातील तसेच परराज्यातील साखर कारखान्यावर जातात. या उसतोड मजुरांची दिवाळी दरवर्षी रस्त्यातच होत असते. सुमारे सहा सात महिने हे ऊस तोडणी कामगार घराबाहेर असतात. गावाकडे फक्त म्हातारी माणसे व शाळेत जाणारी लहान मुले़ असे हे रहाटगाडगे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. शनिवारीही असेच हे ऊस तोडणी कामगार गावाकडे परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला़ (तालुकाप्रतिनिधी)
़़़़़़़़़़़़़़़
अपघातातील २२ मजुरांवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार आहे़ हे सर्व ऊस तोडणी मजूर अत्यंत गरीब परिस्थितीतील असल्याने उपचाराचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न ग्रामस्थ आणि नातेवाईकांसमोर उभा राहिला़ अंत्यविधीसाठी आलेल्या अनेकांना हाच प्रश्न सतावत होता़ त्यामुळे ऊस तोडणी मजुरांवरील उपचाराचा खर्च सरकारने करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत़
....
गावकर्‍यांनी केली वर्गणी
अपघातात जखमी झालेल्या ऊस तोडणी मजुरांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे़ यातील अनेकजण उपचाराचा खर्चही देऊ शकत नाहीत़ त्यामुळे रविवारी (दि़४) सकाळी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून जखमींवरील उपचाराचा खर्च भागविण्याची तयारी केली आहे़ मात्र, सरकारनेही मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ सांत्वन करायला अनेक येतील़ परंतु मदत करणार्‍यांनी पुढे यावे, असे आवाहनही ग्रामस्थ करीत आहेत़