शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:33 IST

इंदूरच्या गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशीला अटक करण्यात आली असून, तिच्यासोबत तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर्सही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

इंदूरच्या गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशीला अटक करण्यात आली असून, तिच्यासोबत तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर्सही पोलिसांच्या ताब्यात आहेत. मेघालय पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास अधिक खोलात घेत सोनमची कसून चौकशी केली असून, तिच्यासमोर थेट आणि गंभीर स्वरूपाचे १३ प्रश्न ठेवण्यात आले.

सोनमकडून ‘हनिमून ते हत्या’ दरम्यानची सत्य परिस्थिती उघड करण्याचा प्रयत्न!मेघालय पोलिसांनी सोनमला विचारले की, तिचा पती राजा रघुवंशीसोबत तिचा झालेला विवाह तिच्यासाठी आनंददायी नव्हता का? तिचा प्रियकर राज कुशवाहा तिच्या आयुष्यात आधीपासून होता का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की, राजाची हत्या करण्यामागे नेमकं तिचं उद्दिष्ट काय होतं?

पोलिसांनी सोनमला विचारलेले प्रमुख प्रश्न:१. तुम्ही आणि राजा मेघालयला हनिमूनसाठी केव्हा प्लॅन केलं होतं?

२. परतीचं तिकीट का बुक केलं नव्हतं? हा भाग आधीपासूनच योजनेत होता का?

३. राज कुशवाहाशी तुमचं पूर्वीपासून नातं होतं का? कारण पुराव्यांनुसार तुमचा सातत्यानं संपर्क होता.

४. एन्क्रिप्टेड चॅट्सवरून असं दिसतं की, हनिमूनदरम्यानही तुम्ही राजसोबत सतत संवाद साधत होतात, तुमच्यात काय बोलणं सुरू होतं?

५. तुमचं लोकेशन आरोपींसोबत सतत का शेअर होत होतं?

६. २३ मे रोजी मावलाखियात तुम्हाला राजा आणि तीन हिंदी भाषिक पुरुषांसोबत पाहण्यात आलं, ते लोक कोण होते?

७. स्थानिक गाईड अल्बर्ट पीडी यांची सेवा का नाकारली आणि दुसऱ्या दिवशीही टाळत राहिलात?

८ . अल्बर्टने ओळखलेले तीन पुरुष नंतर हत्येत सामील असल्याचं उघड झालं – या लोकांना तुम्ही ओळखत होता का?

९. राजाच्या स्मार्टवॉच आणि फोनवरून आरोपींच्या लोकेशनशी जुळणारे पुरावे मिळाले आहेत. मात्र, राजाचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू गायब आहेत, पण तुमचे दागिने शाबूत आहेत. याचं स्पष्टीकरण काय?

१०. राजाच्या आईच्या म्हणण्यानुसार, तो मेघालयला जाण्यास इच्छुक नव्हता – तुम्ही त्याच्यावर दबाव आणला का?

११. लग्नाच्या विधी दरम्यान तुम्ही नाराज दिसत होता, मग हे लग्न का केलं?

१२. राज कुशवाहासोबत मिळून हत्या करण्याचा कट रचल्याचे पुरावे मिळाले आहेत – यावर तुमचं उत्तर काय?

१३. तुम्ही स्वतः राजाला मारण्यासाठी या लोकांशी संगनमत केलं का?

११ मे रोजी लग्न, २ जून रोजी मृत्यू!सोनम आणि राजा यांचे लग्न ११ मे रोजी पार पडले होते. त्यानंतर दोघंही हनिमूनसाठी शिलाँगला गेले. मात्र २ जून रोजी, राजाचा मृतदेह एका दरीजवळील खड्ड्यात सापडला. त्यानंतर सोनमने मेघालय सोडून इंदूर गाठलं आणि तिथे भाड्याच्या घरात वास्तव्य केलं. काही काळाने ती गाझीपूरकडे रवाना झाली, जिथे तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू