शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिका'चा दर्जा; पाकिस्तानी मीडियाची नापाक हेड'लाईन'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 1:15 PM

पाकिस्तानी माध्यमांकडून पुलवामा हल्ल्याचं उदात्तीकरण

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. सीमारेषेवर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानमधील मीडियाने या हल्लेखोरांना स्वातंत्र्य सैनिक म्हटले आहे. तर, या हल्ल्यात 44 भारतीय सैनिकांना ठार केल्याचं पाकिस्तानी मीडियाकडून सांगण्यात येत आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी होत आहे. त्यातच, पाकिस्तानमधील द नेशन या वृत्तपत्राने हल्लेखोरांना स्वातंत्र्य सैनिक (Freedom Fighter) म्हटले आहे. भारताच्या जखमेवर मीठ चोळायचं काम पाकिस्तानच्या माध्यमांकडून करण्यात येत आहे. तसंच या वृत्तपत्रानं पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद या संघटनेनं हा हल्ला घडवल्याचं वृत्तही संघटनेच्या प्रवक्त्याच्या हवाल्यानं फेटाळलं आहे. तर भारतव्याप्त काश्मीरमधील तरुणाईचं हे कृत्य असल्याचंही या वृत्तात म्हटलंय.

पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी 350 किलो आरडीएक्सचा साठा ठेवला होता. जवानांची बस या रस्त्यावरुन जात असताना स्फोटकांनी भरलेल्या कारनं बसला धडक दिली. यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. या हल्ल्यात 37 जवान शहीद झाले, तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. तसेच जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या उरी हल्ल्याप्रमाणेच या हल्ल्याचाही बदला घेण्याची मागणी करण्यात येत आहे. लष्कराने त्या हल्ल्याला मिशन 'सर्जिकल स्ट्राईक' हे नाव दिले होते. या मिशनअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर, भारतीय सैन्याची ताकद जगभरातील देशांनी अनुभवली. त्यामुळे, आताही उरीप्रमाणेच अवंतीपुरा हल्ल्याचाही बदला घ्या, अशी भावना नेटीझन्स व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं घेतली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. पुलवामा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश ए मोहम्मदTerror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर