शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

राहुल गांधींना मोठी 'लॉटरी'; पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला 'या' माजी पंतप्रधानांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 2:43 PM

2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बंगळुरू -  2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुका राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीने घेतला आहे. दरम्यान, राहुल गांधीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधींची दावेदारी भक्कम झाल्याचे मानण्यात येत आहे.  राहुल गांधीना गैर भाजपाई दलांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याबाबत प्रतिक्रिया देताना देवेगौडा म्हणाले, "राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्यास त्यांचा पक्ष तयार आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही."  कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या जोरावरच देवेगौडा यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.  राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या काँग्रेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात चर्चा झाली होती. तसेच  या निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत आघाडी बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यावरही जोर देण्यात आला. तसेच सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते असल्याने राहुल गांधी यांनाच आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्यात यावा यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान आग्रही मागणी केली, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.  2019 साठी काँग्रेसचे मिशन ३०० २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान ३०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी १२ राज्यांतील १५० जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो, असा दावा केला. या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, याचे सर्वाधिकार कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले. देशाच्या १२ राज्यांमध्ये काँग्रेसला चांगला जनाधार आहे. आणखी ताकद लावली, तर तिथे किमान १५० जागा मिळू शकतील, असे चिदम्बरम यांनी बैठकीनंतर सांगितले. आपण १५० जागा जिंकल्यास यूपीएची केंद्रात सत्ता येणे शक्य आहे, कारण यूपीएमधील अन्य राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आणखी १५० जागा सहज जिंकू शकतील, असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेसElectionनिवडणूकH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाkumarswamyकुमारस्वामीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी