शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Video - अखिलेश यादव डॉक्टरांना म्हणाले, 'तुम्ही खूप लहान कर्मचारी आहात, येथून बाहेर जा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:04 AM

'आम्हाला माहीत आहे, काय असते सरकार'

कन्नौज : समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कन्नौजमधील बस अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी 'तुम्ही एक लहान कर्मचारी आहात, येथून बाहेर जा', असे रुग्णालयात जखमींच्या बाजूला उभे असलेल्या डॉक्टरांना अखिलेश यादव यांनी म्हटले. 

अखिलेश यादव रुग्णालयात जखमींकडून घटनेची माहिती घेत होते. त्यावेळी बाजूला उभे असलेले डॉक्टर काहीतरी भाष्य करत होते. त्याचवेळी अखिलेश यादव यांनी डॉक्टरांचे बोलणे थांबविले आणि म्हणाले, "तुम्ही बोलू नका, तुम्ही सरकारी माणूस आहात. आम्हाला माहीत आहे, काय असते सरकार. तुम्ही सरकारी माणूस आहात म्हणून बोलू नका. तुम्ही बोलले नाही पाहिजे." 

यापुढे अखिलेश यादव म्हणाले, "तुम्ही सरकारच्या बाजूने बोलू शकत नाही. तुम्ही खूप लहान कर्मचारी आहात. आरएसएसचे होऊ शकता, भाजपाचे होऊ शकता. मात्र, मला समजू शकत नाही. यानंतर अखिलेश यादव यांनी डॉक्टरांना बाहेरच्या रस्ता दाखवत म्हणाले, "एक पाऊल मागे राहा येथून, बाहेर जा येथून."

अखिलेश यादव यांनी कन्नौजमध्ये जाऊन बस अपघातातील  जखमींकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी अखिलेश यादव यांनी घटनास्थळावर पोहोचून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधत बस मालक आणि चालक भाजपाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले.   

दरम्यान, गेल्या शुक्रवारी रात्री उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 21 जण जखमी झाले. अपघातग्रस्त बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. मात्र वाटेत झालेल्या भीषण अपघातानंतर बसला आग लागली. अपघाताची तीव्रता आणि लागलेली आग इतकी भीषण होती की त्यामुळे बसमधून प्रवास करत असलेल्या अनेक प्रवाशांना बसमधून बाहेरही पडता आले नाही. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा

'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना

संतप्त शिवप्रेमींच्या तीव्र निदर्शनानंतर ‘आज के शिवाजी’ पुस्तक घेतले मागे

मोदी-शाह-डोवालांच्या फोटोंवर क्रॉस, प्रज्ञा सिंह ठाकूरांना मिळाले संशयित पत्र

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेश