Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 09:22 AM2020-01-14T09:22:51+5:302020-01-14T09:36:12+5:30

आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Delhi elections BJP seeks Rs 500 crore in damages after AAP video spoofs Manoj Tiwari | Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा

Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा

Next
ठळक मुद्देआम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.भाजपाने आम आदमी पार्टी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून 500 कोटींचा दावा ठोकला.भाजपानेही अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करणारा 'पाप की अदालत' हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेसाठी  8  फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आप'ने शनिवारी ट्विट केलेल्या एका गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्यावरून भाजपाने आम आदमी पार्टी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून 500 कोटींचा दावा ठोकला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या भोजपुरी गाण्यांचे क्लिपींग्स एकत्र करून त्यात 'लगे रहो केजरीवाल' हे आपचे प्रचारगीत मिक्स केले आहे. आम आदमी पार्टीने हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अपलोड केला आणि तो काही तासांमध्ये देशभर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून मनोज तिवारी संतापले आहेत. माझ्या गाण्यांचे व्हिडीओ निवडणुकीच्या प्रचारगीतासाठी वापरण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. 

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विधानसभा निवडणुकीतील पराभव पुढे दिसू लागला आहे. त्यामुळे ते अशा प्रकारच्या व्हिडीओचा आधार घेत असल्याचं मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही व्हिडीओबाबत तक्रार केली असून मानहानीसाठी तसेच खासगी संपत्तीचा गैरवापर केला म्हणून 500 कोटींचा दावाही ठोकला असल्याची माहिती तिवारी यांनी दिली आहे. 

भाजपानेही अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करणारा 'पाप की अदालत' हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 1.46 कोटी मतदार मतदान करतील. 13 हजार 750 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाईल. मतदान केंद्रांवर दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा दिली जाईल. तसेच 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक पोस्टल बॅलेटद्वावर मतदान करू शकतील याची माहिती दिली. 

 

महत्त्वाच्या बातम्या 

'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना

संतप्त शिवप्रेमींच्या तीव्र निदर्शनानंतर ‘आज के शिवाजी’ पुस्तक घेतले मागे

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचं मोठं विधान; म्हणाले, भारतात जे घडतंय ते अतिशय दु:खद

मोदी-शाह-डोवालांच्या फोटोंवर क्रॉस, प्रज्ञा सिंह ठाकूरांना मिळाले संशयित पत्र

 

Web Title: Delhi elections BJP seeks Rs 500 crore in damages after AAP video spoofs Manoj Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.