मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचं मोठं विधान; म्हणाले, भारतात जे घडतंय ते अतिशय दु:खद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 07:52 AM2020-01-14T07:52:36+5:302020-01-14T11:33:16+5:30

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भारतात विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे.

microsoft ceo satya nadella statement on caa said sad for india bangladeshi immigrant infosys ceo | मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचं मोठं विधान; म्हणाले, भारतात जे घडतंय ते अतिशय दु:खद

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचं मोठं विधान; म्हणाले, भारतात जे घडतंय ते अतिशय दु:खद

Next
ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भारतात विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीसुद्धा या परिस्थितीला दु:खद असल्याचं म्हटलं आहे.जर एखादा बांगलादेशी निर्वासित भारतात इन्फोसिसचा सीईओ बनल्यास मला आनंद होईल. 

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भारतात विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे. त्यानंतर आता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीवर खंत व्यक्त केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीसुद्धा या परिस्थितीला दु:खद असल्याचं म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात बजफीडचे संपादक बेन स्मिथ यांनी सत्या नाडेला यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी या सर्व परिस्थितीवर भाष्य केलं. मला वाटतं जे होतंय ते अतिशय दुःखद आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेला यांनी मॅनहटन इथल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं. विशेष म्हणजे नागरिकत्व कायद्यावरून देशभरात विरोधी पक्षांचं विरोध प्रदर्शन सुरू असतानाच नाडेला यांनी हे वक्तव्य केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. जर एखादा बांगलादेशी निर्वासित भारतात इन्फोसिसचा सीईओ बनल्यास मला आनंद होईल. सत्या नाडेला यांच्यामार्फत मायक्रोसॉफ्ट इंडियाद्वारे खुलासा करण्यात आला आहे. प्रत्येक देशाला आपल्या सीमा परिभाषित करणं, राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करणं आणि कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत हे सर्व जनता आणि सरकारकडून विचार विनिमयातून ठरवलं जातं. मी भारतीय मूल्यांच्या आधारावरच मोठा झालो आहे. भारतातल्या विविधतेतल्या संस्कृतीतही एकता आहे. अमेरिकेतला माझा प्रवासी अनुभवही चांगला राहिला आहे. भारतात येऊन एखाद्या प्रवासी निर्वासितानं चांगला स्टार्ट अप व्यवसाय, मोठी कंपनी सांभाळण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. जेणेकरून त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल.



10 जानेवारीला देशभरात लागू झाला CAA
देशभरात झालेल्या विरोध प्रदर्शनानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा शुक्रवारी 10 जानेवारीला लागू करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयानं एक अधिसूचना जारी करत हा कायदा लागू केल्याचं सांगितलं. त्यामुळे आता पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या गैर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. या कायद्याला संसदेनं मंजुरी दिल्यानंतर अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात आलं होतं. तर भाजपानंही या कायद्यासंदर्भात माहिती देणारं एक अभियान राबवलं आहे.  या विरोध प्रदर्शनात बॉलिवूडचे काही कलाकारही सहभागी झाले आहेत. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि जामिया मिलिया सारख्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी महिन्याभराहून अधिक काळ या कायद्याविरोधात प्रदर्शन करत आहेत. 

Web Title: microsoft ceo satya nadella statement on caa said sad for india bangladeshi immigrant infosys ceo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.