माजी आमदाराचा सुनेवरच बलात्कार, पोलिसात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 13:26 IST2019-08-13T13:14:43+5:302019-08-13T13:26:05+5:30
पीडित महिलेने तक्रारी दाखल करतान, मी माहेरी गेली असताना, माझ्या पतीनेच मला घर नेण्याऐवजी एका हॉटेलमध्ये नेले.

माजी आमदाराचा सुनेवरच बलात्कार, पोलिसात गुन्हा दाखल
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी भाजपा नेते आणि माजी आमदाराविरुद्ध कथित बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. 31 डिसेंबर 2018 च्या पार्टीवेळी सासऱ्याने हे लाजीरवाणे कृत्य केल्याचं सुनेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. 31 डिसेंबरची पार्टी संपल्यानंतर 1 जानेवारी 2019 रोजी मध्यात्री बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली. आरोपी हे नांगलोई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. रघुवेन्द्र शौकीन असे या महाशयांचे नाव आहे.
पीडित महिलेने तक्रारी दाखल करतान, मी माहेरी गेली असताना, माझ्या पतीनेच मला घर नेण्याऐवजी एका हॉटेलमध्ये नेले. या हॉटेलमध्ये अगोदरच माझे नातेवाईक नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीला हजर होते. त्यानंतर पार्टी झाल्यानंतर साधारण 12.30 वाजता आम्ही सर्वजण घरी आलो. माझे पती त्यांच्या मित्रांसमेवत निघून गेले, त्यामुळे मीही माझ्या खोलीत झोपायला गेले होते. त्याचवेळी, मध्यरात्री 1.30 वाजता माझ्या सासऱ्यांना मला आवाज दिला. तुला महत्वाचं सांगायचंय असे म्हणत त्यांनी मला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर, दारूच्या नशेत मला नको तिथे स्पर्श करु लागले. त्यामुळे मी त्यांना झोपायला जाण्याचे सूचवले. त्यावर, बंदुकीचा धाक दाखवत आणि माझ्या भावाला ठार मारण्याची धमकी देत त्यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडिताने तक्रारीत केला आहे.
दरम्यान, केवळ माझा संसार वाचावा आणि माझ्या भावाला कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून मी यापूर्वीही कुठलिही तक्रार दाखल केली नसल्याचेही पीडिताने म्हटले. तसेच, सीएडब्लू म्हणजेच क्राईम अगेन्स्ट वुमेनकडेही यापूर्वीच घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर, पोलिसांनी कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.