शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्र मंत्रालयाचे नवे फेसबुक अ‍ॅप

By admin | Updated: August 20, 2016 01:20 IST

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी परदेशातील भारतीय नागरिकांसाठी स्वत:चे स्वतंत्र फेसबुक अ‍ॅप सुरू केले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात परदेशस्थ भारतीयाला

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी परदेशातील भारतीय नागरिकांसाठी स्वत:चे स्वतंत्र फेसबुक अ‍ॅप सुरू केले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात परदेशस्थ भारतीयाला अचानक कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली तर परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून मदतीच्या अपेक्षेबाबत त्यांना या नव्या अ‍ॅपमुळे यापुढे नाराज व्हावे लागणार नाही. त्यांना लगेच मदत मिळेल.या फेसबुक अ‍ॅपविषयी माहिती देतांना मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, फेसबुक पेजवर सर्वात वरच्या भागात असलेल्या भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अ‍ॅपवर क्लिक केल्यास जगाच्या पाठीवर आपण कोणत्याही देशात असलात तरी, सर्वप्रथम साऱ्या जगाचा नकाशा उघडेल. त्यात प्रत्येक देशातील भारतीय दूतावास अधोरेखित केले असून, संबंधित दूतावासावर क्लिक केल्यास तेथील उच्चायुक्त कार्यालये, कॉन्स्युलेटस, विदेशातील भारतीय कार्यालये इत्यादींची समग्र माहिती, दूतावासांसह अधिकाऱ्यांचे पत्ते, फोन नंबर्स आदी उपलब्ध होईल. त्याद्वारे भारतीयांना संबंधित देशातील भारतीय दूतावासावर क्लिक करून तेथील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या समस्येचे निराकरण करणे शक्य होईल.स्वरूप पुढे म्हणाले, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज स्वत: व्टिटरच्या माध्यमातून २४ तास साऱ्या जगाच्या संपर्कात असतात. विविध देशांतून अनेक लोक ट्वीट करून आपल्या समस्या त्यांना कळवतात. प्रत्येकाला त्या उत्तर देतात आणि त्यांची समस्या संबंधित राजदूताला कळवतात. आजवर कोणालाही त्यांनी नाराज केले नाही.तक्रार निवारणाचा भार कमी होणारतथापि त्यातून एक महत्त्वाची बाब मंत्रालयाच्या निदर्शनाला आली की त्यातली अनेक निवेदने असतात की ज्याची उत्तरे स्वत: परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी देण्याची आवश्यकता नाही. संबंधित देशातील भारतीय राजदूत अथवा त्यांचे कार्यालय ते काम सहजपणे करू शकते. परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांचा तक्रार निवारणाचा भार कमी करण्यासाठी आणि परदेशातील भारतीयांच्या समस्या लवकर सोडवण्यासाठी या फेसबुक अ‍ॅपचा उपयोग होईल.