शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

तब्बल दोन दशकांनंतर फोर्ड इंडिया फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 8:34 AM

मेरिकी कार निर्माता कंपनी फोर्डने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करून 20 वर्षे झाली. मात्र, ही कंपनी आजतागायत तोट्यातच चालविली जात होती.

नवी दिल्ली : अमेरिकी कार निर्माता कंपनी फोर्डने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करून 20 वर्षे झाली. मात्र, ही कंपनी आजतागायत तोट्यातच चालविली जात होती. डिलर्स कडून ग्राहकांची लुटालूट, महिंद्रा कंपनीसोबत वर्षभरातच मोडलेला सहकार्य करार आणि भारतीय मानसिकतेमध्ये झालेली बदनामी या मागे असली तरीही फोर्डने तब्बल वीस वर्षानंतर नफा कमविला आहे. 

फोर्डने भारतात फोर्ड इंडिया नावाची उपकंपनी 1995 मध्ये स्थापन केली होती. स्पेअरपार्ट आणि इतर सेवांसाठी त्यांनी महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीशी करार केला होता. मात्र, काही कारणास्तव हा करार मोडला आणि फोर्डच्या ग्राहकांना स्पेअरपार्ट मिळेनासे झाले. यानंतर खरी फोर्डची व्यावसायिक स्पर्धा आणि भारतीय ग्राहकांकडून बदनामी सुरु झाली. लाखो इन्व्हेस्ट करून परतावा काहीच मिळत नसल्याने डीलरनीही ग्राहकांना लुबाडायला सुरुवात केली आणि फोर्डची अधोगती सुरु झाली. 

फोर्ड या कंपनीच्या कार प्रामुख्याने सुरक्षेसाठी ओळखल्या जातात. मात्र, सुरुवातीच्याच काळात झालेल्या बदनामीमुळे फोर्डला पुन्हा भारतीयांमध्ये स्थान मिळविण्यास खूप झगडावे लागले. प्रथम फोर्डने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी दरात सर्व्हिस देण्याचे वचन द्यावे लागले. तसेच कमी किंमतीत स्पेअरपार्टही द्यावे लागले. नकारात्मक जाहिराती करत ग्राहकांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न केला. यासाठी फोर्डला 20 वर्षे खस्ता खाव्या लागल्या. फोर्ड फिगो, अस्पायर, इकोस्पोर्ट सारख्या ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या कार भारतीय बाजारात आणल्या आणि रुप पालटले. 

फोर्डने खर्च कमी करण्यासाठी भारतातील काही कंपन्यांशी करार केले. ही रणनिती कामी आली आणि फोर्डने 2015-16 मध्ये 2.1 अब्ज डॉलर्सवरून 2016-17 2.8 अब्ज डॉलर्स आणि 2017-18 3.4 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय केला. फोर्डने कार्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडे दाखल केलेल्या अहवालात ही बाब म्हटली आहे. 

भारतातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीला एक हॅचबॅक विकसित करण्यासाठी 1 हजार कोटी खर्च आला. तर फोर्डला अस्पायर प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी 3500 कोटींचा खर्च आला होता. उलट मारुतीने या हॅचबॅकच्या विक्रीतून दरवर्षी 8 हजार कोटींचा नफा कमविला होता. सध्या फोर्डने महिंद्रा सोबत पुन्हा सहकार्य करार केला असून 2020 मध्ये या कंपनीच्या तीन नवीन कार लाँच होणार आहेत. तसेच फोर्डने काही अब्ज डॉलर्सची रक्कम अमेरिकेबाहेरील बाजारात गुंतविण्याचे ठरविले आहे. 

टॅग्स :Fordफोर्डcarकारAutomobileवाहन