शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आलमविरुद्ध गुन्ह्यांचा पाठपुरावा करा

By admin | Updated: March 12, 2015 23:56 IST

जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेमुळे कोंडीत सापडलेले केंद्र सरकार आता याप्रकरणी कुठलाही नवा धोका पत्करण्याच्या तयारीत नाही.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेमुळे कोंडीत सापडलेले केंद्र सरकार आता याप्रकरणी कुठलाही नवा धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. आलमविरुद्धच्या सर्व २७ प्रकरणांचा काटेकोरपणे पाठपुरावा करून त्याला जामीन देणाऱ्या आदेशाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याची प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश केंद्र सरकारने जम्मू-कश्मीर सरकारला दिले आहेत.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात आलम मुद्यावर निवेदन सादर केले. राज्य व केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने आलम व त्याच्या सहकाऱ्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. आलमच्या सुटकेनंतर देशभरात आणि संसदेतही तीव्र रोष जाहीर करण्यात आला होता. खुद्द पंतप्रधानांनीही या असंतोषात आपणही सहभागी असल्याचे सांगितले होते. केंद्र सरकारने हा निर्णय अमान्य असल्याचे सांगून जम्मू-काश्मीर सरकारला अहवाल मागितला होता. राज्य सरकारचा पहिला अहवाल फेटाळल्यानंतर नव्याने अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने बुधवारी रात्री गृहमंत्रालयाला पाठविलेल्या नव्या अहवालाचा तपशील राजनाथसिंग यांनी सभागृहाला दिला. मसरत आलमच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली आहे. आलम किंवा त्याचे साथीदार कुठल्याही देशविघातक कारवाया करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने केंद्राला दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)