पंजाबचे पाचवेळा मुख्यमंत्री, शिरोमणीच्या प्रकाश सिंग बादल यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 09:42 PM2023-04-25T21:42:23+5:302023-04-25T21:42:57+5:30

बादल यांचे पीए आणि मुलाने निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. 

Five-time Chief Minister of Punjab, Prakash Singh Badal of Shiromani akali dal leader passed away at 95 age | पंजाबचे पाचवेळा मुख्यमंत्री, शिरोमणीच्या प्रकाश सिंग बादल यांचे निधन

पंजाबचे पाचवेळा मुख्यमंत्री, शिरोमणीच्या प्रकाश सिंग बादल यांचे निधन

googlenewsNext

चंदीगड: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांचे आज निधन झाले. ते गेल्या आठवड्यापासून मोहालीतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. बादल यांचे पीए आणि मुलाने निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. 

प्रकाश सिंह बादल यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. ते ९५ वर्षांचे होते. बादल यांच्या प्रकृतीमध्ये सोमवारी सुधारणा झाली होती. पंजाबचे ते पाचवेळा मुख्यमंत्री होते. बादल यांना गैस्ट्राइटिसचा देखील त्रास होत होता. यासाठी त्यांना गेल्यावर्षी जूनमध्ये देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 




पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री
बादल हे पंजाबचे पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. १९५० च्या दशकात त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. 1970-71, 1977-80 त्यांनी पाचवेळा पंजाबचे नेतृत्व केले आहे. बादल यांनी गेल्या वर्षी पंजाबमध्ये निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. 

Web Title: Five-time Chief Minister of Punjab, Prakash Singh Badal of Shiromani akali dal leader passed away at 95 age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.