शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला? 5 सदस्यिय समितीने सोनिया गांधींकडे सोपवला रिपोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 9:15 AM

या समितीतील माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी हे काँग्रेसच्या ‘जी 23’ समूहाचेही सदस्य आहेत. या समूहाने संघटनात्मक निवडणूक आणि जबाबदारीसह उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी गेल्या काही महिण्यांपासून करत आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पदुचेरी येथे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात तामिळनाडू वगळता इतर राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला. या निवडणुकांतील पराभवाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसने 5 सदस्यांची एक समिती तयार केली होती. या समितीने आता आपला अहवाल काँग्रेसच्या  हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) यांना सोपवला आहे. (Five member committee of Congress submitted its initial report to sonia gandhi on defeat in assembly elections 2021)

समितिला देण्यात आला होता दोन आठवड्यांचा कालावधी -मिळालेल्या माहितीनुसार, या समितीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि विंसेट पाला यांचा समावेश होता. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे या समितीचे नेतृत्व होते. या समितीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पदुचेरीतील नेत्यांशी अनेक बैठका केल्या. अहवाल सादर करण्यासाठी या समितीला दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. 

प्रियांका गांधींना अध्यक्ष करा; मागणी जोर धरू लागली

सोनिया गांधींनी दिला होता समितीचा प्रस्ताव -या समितीतील माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी हे काँग्रेसच्या ‘जी 23’ समूहाचेही सदस्य आहेत. या समूहाने संघटनात्मक निवडणूक आणि जबाबदारीसह उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी गेल्या काही महिण्यांपासून करत आहे. काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) डिजिटल बैठकीत, निवडणूक निकालाच्या कारणांची माहिती मिळविण्यासाठी एक छोटी समिती तयार करण्यात यावी, असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ठेवला होता, याला सीडब्ल्यूसीने सहमती दर्शवली होती. 

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे खातेही उघडले नाही -आसाम आणि केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे खातेही उघडले नाही. तसेच पदुचेरीतरही काँग्रेसचा पराभव झाला. येथे निवडणुकीच्या काही दिवस आधीपर्यंत काँग्रेस सत्तेत होती. तामिळनाडू काँग्रेसला थोडा बहूत दिलासा मिळाला, येथे द्रमूकसोबत असलेल्या त्यांच्या आघाडीला विजय मिळाला. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021