शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

लोकपाल लागू झाल्यास पहिले आरोपी नरेंद्र मोदीच असतील - वीरप्पा मोईली 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:14 AM

राफेल विमान करारावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

ठळक मुद्देलोकपाल कायदा लागू झाला असता तर राफेल विमान करारप्रकरणी पहिेले आरोपी नरेंद्र मोदी हेच ठरले असतेपंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाचू शकतात, पण उद्या नाहीराफेल किंवा अन्य कुठल्याही शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याविरोधात काँग्रेस पक्ष नाही. तुम्ही 70 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या HAL सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे दुर्लक्ष  करू शकत नाही

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह काँग्रेसचे सर्वच नेते या करारावरून केंद्र सरकारवर चौफेर टीका करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठीच केंद्र सरकारने लोकपाल कायदा लागू केलेला नाही. जर हा कायदा लागू झाला असता तर राफेल विमान करारप्रकरणी पहिेले आरोपी नरेंद्र मोदी हेच ठरले असते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.  2019-20 साठीच्या अर्थसंकल्पावर सोमवारी  संसदेमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेचे वीरप्पा मोईली म्हणाले की, ''केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी केलेली आर्थिक तरतूद ही चीनच्या एकूण संरक्षणाच्या तरतुदीचा केवळ पाचवा भाग आहे. आता त्यातील 20 टक्के रक्कम ही  राफेल विमानांसाठी जाईल. त्यातून सरकारचा कमकुवतपणा उघड झाला आहे. मला वाटते  म्हणूनच सरकार लोकपाल विधेयक लागू करत नाही आहे. जर लोकपाल विधेयक लागू झाले  तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पहिले आरोपी ठरू शकतात. त्यामुळेच ते सध्या घाबरले आहेत. तसेच या प्रकरणाची जेपीसी चौकशीही करण्यात आलेली  नाही.''  मोईली पुढे म्हणाले की,''पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाचू शकतात, पण उद्या नाही. पंतप्रधान सर्वांविरोधात इडी आणि सीबीआयचा वापर करत आहेत. मात्र राफेल किंवा अन्य कुठल्याही शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याविरोधात काँग्रेस पक्ष नाही. तुम्ही 70 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या HAL सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे दुर्लक्ष  करू शकत नाही '', दरम्यान,  भारतीय हवाईदलासाठी दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा ७.८७ युरो खर्चाचा करार फ्रेंच सरकारशी करण्याच्या काही दिवस आधी मोदी सरकारने अशा प्रकारच्या करारांमध्ये एरवी नियमितपणे समाविष्ट केली जाणारी एकूण आठ कलमे मोदी सरकारने ऐनवेळी वगळली, असा दावा ‘दि हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने सोमवारी केला.या व्यवहारासंबंधीच्या सरकारी फायलींमधून उपलब्ध झालेल्या नव्या माहितीवरून ही बाब स्पष्ट होत असल्याचे वृत्त या दैनिकाने प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या अधिकृत वाटाघाटी समितीच्या चर्चा अपूर्ण असतानाच पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे फिरू लागल्यानंतर प्रस्तावित करारात करायचे हे बदल घाईघाईने मंजूर केले गेले. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसParliamentसंसद