आसाराम बापूंविरूद्ध साक्ष देणा-यावर व्यक्तीवर गोळीबार

By Admin | Updated: May 23, 2014 21:58 IST2014-05-23T21:49:12+5:302014-05-23T21:58:30+5:30

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आसाराम बापूंवर खटला सुरू आहे. या प्रकरणी आसाराम विरूद्ध साक्ष देणा-या अमृत प्रजापती यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी गोळीबार केला.

A firing by a person on witness against Asaram Bapu | आसाराम बापूंविरूद्ध साक्ष देणा-यावर व्यक्तीवर गोळीबार

आसाराम बापूंविरूद्ध साक्ष देणा-यावर व्यक्तीवर गोळीबार

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २३- अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आसाराम बापूंवर खटला सुरू आहे. या प्रकरणी आसाराम विरूद्ध साक्ष देणा-या अमृत प्रजापती यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी प्रजापती यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. राजकोट (राजस्थान) येथील पेडक रोडवरील ओमशांती क्लिनिक येथे प्रजापती गेले असता त्यांच्यावर हल्ला झाला. प्रजापती हे गेली १२ वर्षे अहमदाबाद येथील आसाराम बापूंच्या आश्रमात वैद्य म्हणून नोकरी करत होते. आश्रमातील एका सेविकेने आसाराम यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या घटनेनंतर प्रजापती यांनी राजीनामा दिला. तसेच आश्रामातील गैरप्रकारांबद्दल वाच्यता केली होती. काही दिवसांपूर्वीच सुप्रिम कोर्टाने आसाराम यांना जामीन नकारला आसून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Web Title: A firing by a person on witness against Asaram Bapu