शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाक करताना गॅसची नळी निघाल्याने घरात आग कंजरवाड्यातील घटना : भाट कुटूंब बालंबाल बचावले, तीन लाखाच्यावर नुकसान

By admin | Updated: October 8, 2016 23:51 IST

जळगाव: घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गॅसची नळी निघाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच संपूर्ण घरात आग लागली. सिलिंडर स्फोट होण्याआधीच घरातील मंडळी बाहेर पडाल्याने ते बालंबाल बचावले. जुनी जोशी कॉलनीला लागून असलेल्या कंजरवाड्यात शनिवारी संध्याकाळी धीरज रमेश भाट यांच्या घरात ही घटना घडली. या घटनेत दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ७० हजार रुपये रोख व घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य खाक झाले आहे. तीन लाखाच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जळगाव: घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गॅसची नळी निघाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच संपूर्ण घरात आग लागली. सिलिंडर स्फोट होण्याआधीच घरातील मंडळी बाहेर पडाल्याने ते बालंबाल बचावले. जुनी जोशी कॉलनीला लागून असलेल्या कंजरवाड्यात शनिवारी संध्याकाळी धीरज रमेश भाट यांच्या घरात ही घटना घडली. या घटनेत दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ७० हजार रुपये रोख व घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य खाक झाले आहे. तीन लाखाच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कंजरवाड्यात अतिशय दाट वस्तीत धीरज भाट हे वरच्या मजल्यावर राहतात. अडीच ते तीनशे चौरस फुटाच्या खोलीत लाकडी दरवाजाच्या बाजूलाच गॅस सिलिंडर, बेड, अंथरुण, कपडे व अन्य साहित्य आहे. पत्नी रंजना भाट या पालक पनीरची भाजी बनवत असताना पती धीरज, मुलगी भूमी, शिरी व मुलगा तनीश हे शेजारी बेडवर बसून टिव्ही पाहत होते. अचानकपणे शेगडीतून नळी निघाल्याने गॅस बाहेर निघाला व आगीचा भडका उडाला. हा प्रकार पाहताच भाट यांनी तातडीने पत्नी व मुलांना सोबत घेत घराबाहेर धाव घेतली.
अन् मोठा अनर्थ टळला
भाट परिवार जोराने आरडाओरड करत असल्याचे पाहून गल्लीतील नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. आगीचे लोळ व धूर पाहता घरात आग लागल्याचे आगीची बातमी वार्‍यासारखी पसरुन पळापळ झाली. जग्गू भाट याने पेटती नळी तोडून सिलिंडर घराच्या बाहेर काढले तर समीर तडवी व प्रदीप नेतलेकर यांनी शेजारचा दरवाजा तोडून रस्ता मोकळा केला. विशाल जोशी या तरुणाने अग्निशमन दल, पोलीस नियंत्रण कक्ष व एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. शेजारच्यांच्या घरातून पाणी आणून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
अग्निशमनचा बंब आला, मात्र उपयोग नाही
घटनेची माहिती दिल्यानंतरही अग्निशमन दलाचा बंब उशिरा पोहचल्याचा आरोप नागरिकांनी केला. उशिरा येऊन बारीक गल्ल्यांमुळे घटनास्थळावर बंब पोहचू शकला नाही. त्यामुळे त्याचा उपयोगच झाला नाही. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक सचिन बागुल, समाधान पाटील यांनी घटनास्थळ गाठून आगीचे कारण जाणून घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.