शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

अनुराग कश्यप-तापसी पन्नूच्या ठिकाणांवर IT चे छापे, निर्मला सीतारमण यांनी अशी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 5:49 PM

आयकर विभागाने बुधवारी टॅक्स चोरीप्रकरणात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूसह अनेक बॉलीवुड कलाकारांच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान अनुराग कश्यप आणि तापसी यांची पुण्यात चौकशीही झाली होती.

ठळक मुद्देबॉलिवुड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईवरून देशभरात राजकारण सुरू आहे.अनुराग कश्यप आणि तापसी यांची पुण्यात चौकशीही झाली होती.आयकर विभागाच्या माहितीनुसार दोन मोठ्या फिल्म प्रोडक्शन, अभिनेत्री तापसी पन्नू आणि दोन व्यवस्थापन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - बॉलिवुड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईवरून देशभरात राजकारण सुरू आहे. काही लोक ही कारवाई योग्य असल्याचे म्हणत आहेत, तर काहींनी ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman) यांना विचारण्यात आले, तेव्हा त्या म्हणाल्या, आमचे सरकार असताना जेव्हा अशा प्रकारची कारवाई होते, तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित केले जाते. मात्र, 2013 मध्ये जेव्हा कलाकार मंडळींवर कारवाई झाली, तेव्हा कुणीही प्रश्न उपस्थित केला नव्हता. (Finance minister Nirmala sitharaman says about it action against anurag kashyap taapsee pannu)

तापसी-अनुरागनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढली, रिलायन्स एंटरटेनमेन्टसह 4 कंपन्यांवर ITच्या धाडी

निर्मला सीतारमण म्हणाल्या, ''मी कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख करणार नाही आणि कुणाचे नावही घेणार नाही. मात्र, आमच्या सरकारच्या काळात अशा प्रकारची कारवाई होते, तेव्हा प्रश्न उपस्थित होतात. मात्र, 2013 मध्ये या लोकांवर कारवाई झाली होती. तेव्हा कुणीही कुठल्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित केला नाही.''

सीतारण म्हणाल्या, ''हे दुटप्पी धोरण नाही? जे होत आहे, ते बरोबर आहे, की चूक याचा विचार आपण मुळापर्यंत जाऊन करायला नको? की, आमच्या सरकारने छापेमारी केली आहे. त्यामुळे फक्त प्रश्नच उपस्थित करायचे?''

बुधवारी झाली होती छापेमारी -आयकर विभागाने बुधवारी टॅक्स चोरीप्रकरणात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूसह अनेक बॉलीवुड कलाकारांच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान अनुराग कश्यप आणि तापसी यांची पुण्यात चौकशीही झाली होती.

"…त्याचीच किंमत तापसी आणि अनुरागला चुकवावी लागतेय", सामनातून मोदी सरकारवर निशाणा

याप्रकरणावरून राजकारणही सुरू झाले आहे, या कारवाईवरून काँग्रेस आणि एनसीपीने केंद्र सरकारवर बदला घेत असल्याचा आरोप केला. तर आयकर विभागाने कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली असल्याचे सरकारने म्हटले आहे.

350 कोटी रुपयांच्या कर चोरीची शंका -आयकर विभागाच्या माहितीनुसार दोन मोठ्या फिल्म प्रोडक्शन, अभिनेत्री तापसी पन्नू आणि दोन व्यवस्थापन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. छापेमारीत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथील घर आणि कार्यालयांचा समावेश होता. एकूण मिळून तब्बल 28 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यात मिळकत (income) आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत. आयकर विभागाला या प्रकरणात एकूण मिळून 350 कोटी रुपयांच्या कर चोरीची शंका आहे. 

बापरे! ३५० कोटींची अफरातफर; तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप प्रकरणात मोठे पुरावे हाती!असं आहे प्रकरण -2011 मध्ये अनुराग कश्यप, मधू मनटेना, विक्रमादित्य मोटवाने आणि विकास बहल यांनी फॅम्टम फिल्म्सची स्थापना केली होती. मात्र, ऑक्टोबर 2018 मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली होती. सूत्रांचे म्हणणे आहे, की कपंनी आणि यांच्यावतीने फाईल केलेले रिटर्न जुळत नाहीत. हा थेट टॅक्सचोरीचाच संकेत आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामनTaapsee Pannuतापसी पन्नूAnurag Kashyapअनुराग कश्यप