बिजापूर (छत्तीसगड): छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात बुधवारी (3 डिसेंबर) भीषण चकमक झाली. या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद आणि एक जखमी झाला आहे. ही कारवाई पश्चिम बस्तर डिव्हिजनच्या जंगलात सुरू असून, अद्यापही अधून-मधून गोळीबार सुरू असल्यामुळे मृत माओवादींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्च ऑपरेशनदरम्यान अचानक चकमक
सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती की, बिजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जमले आहेत. या माहितीच्या आधारे DRG, STF आणि CRPF-ची कोब्रा बटालियन यांचे संयुक्त पथक सर्च ऑपरेशनसाठी रवाना झाले. पथक जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला.
सुरक्षा दलांच्या जवानांनीही प्रतिउत्तर दिले, ज्यात 5 माओवादी ठार झाले. बीजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी सांगितले की, बिजापूर-दंतेवाडा सीमेजवळील गंगालूर परिसर कुख्यात माओवादी कमांडर पापारावच्या नियंत्रणाखालील मानला जातो.
16 दिवसांपूर्वी हिडमाचा अंत
या चकमकीला विशेष महत्त्व आहे, कारण 18 नोव्हेंबरला टॉप नक्षल नेता माडवी हिडमा आंध्र पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला होता. हिडमावर 1 कोटी रुपयांहून अधिक इनाम जाहीर होते. तो सुकमा जिल्ह्यातील पूवर्ती गावचा रहिवासी आणि नक्सल चळवळीचा महत्त्वाचा लष्करी चेहरा होता.
नक्षलविरोधी मोहिमेला वेग
बस्तर रेंजमध्ये नक्षलविरोधी कारवाया सध्या वेगाने सुरू आहेत. केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद निर्मूलनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात संयुक्त कारवायांची तीव्रता वाढवली जात आहे.
Web Summary : A fierce encounter in Chhattisgarh's Bijapur district resulted in the death of 7 Naxalites and the loss of 2 soldiers. The operation continues in the West Bastar forests, following intelligence about a large Maoist gathering. Naxal operations are intensified after a top Naxal leader was killed recently.
Web Summary : छत्तीसगढ़ के बीजापुर जिले में सुरक्षा बलों और नक्सलियों के बीच भीषण मुठभेड़ में 7 नक्सली मारे गए और 2 जवान शहीद हो गए। पश्चिम बस्तर के जंगलों में ऑपरेशन जारी है, माओवादियों के जमावड़े की सूचना मिली थी। हाल ही में एक शीर्ष नक्सली नेता के मारे जाने के बाद नक्सल विरोधी अभियान तेज कर दिया गया है।