Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:52 IST2025-11-22T12:52:37+5:302025-11-22T12:52:58+5:30
Delhi Blast : लाल किल्ला स्फोटानंतर अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
लाल किल्ला स्फोटानंतर अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तपास पथकाने आतापर्यंत १२ हून अधिक युनिव्हर्सिटी कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली आहे, परंतु बहुतेक विधानांमध्ये गंभीर विरोधाभास आढळून आले आहेत, ज्यामुळे संशयाला आणखी वाढला आहे.
तपासात असंही समोर आलं आहे की, संशयित लोकांनी अचानक सोशल मीडिया अकाउंट (फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स) डीएक्टिव्हेट केलं आहे. अनेक व्यक्तींचे फोन देखील सतत बंद आहेत. यामुळे स्फोटानंतरची घटना लपविण्याचा संघटित कट रचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे स्फोटानंतर युनिव्हर्सिटीशी संबंधित अनेक डॉक्टर आणि कर्मचारी अचानक गायब झाले आहेत.
परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
तपास पथकाने २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या अनेक बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे. सुरुवातीच्या तपासात काही व्यवहार संशयास्पद आढळले आहेत, ज्यामुळे मोठ्या नेटवर्कचा सहभाग असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की विद्यापीठाशी संबंधित अनेक पैलू आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
"आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी गनी हा फरिदाबादमधील भाड्याच्या खोलीचा वापर लॅब म्हणून करत होता. तो पिठाच्या गिरणीचा वापर करून युरिया बारीक दळत असे आणि नंतर स्फोटकांमध्ये वापरले जाणारे केमिकल तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक मशीनने ते शुद्ध करत असे.
शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्याच खोलीवर छापा टाकला आणि ३६० किलो अमोनियम नायट्रेटसह मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ जप्त केले. चौकशीदरम्यान गनीने कबूल केलं की, तो बराच काळ याच प्रक्रियेचा वापर करून युरियापासून अमोनियम नायट्रेट वेगळे करून स्फोटकं तयार करत होता. तपासात असंही उघड झालं की गनी हा फरिदाबादमधील अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता.