शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तालुक्यात जातीनिहाय सर्वेक्षण यादी प्रसिद्ध

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

जुन्नर : सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण २०११ अंतर्गत प्रारूप याद्या १९ मार्च रोजी जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती चार्ज अधिकारी सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण २०११ तथा गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी दिली.

जुन्नर : सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण २०११ अंतर्गत प्रारूप याद्या १९ मार्च रोजी जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती चार्ज अधिकारी सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण २०११ तथा गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी दिली.
याविषयी सविस्तर माहिती देताना सचिन घाडगे म्हणाले, की या प्रारूप याद्यांचे वाचन ग्रामसभेमध्ये होणार आहे. २८ मार्चपूर्वी ग्रामसभा घेण्याबाबत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना सूचित करण्यात आले आहे. यासंदर्भात ग्रामस्थांचे काही आक्षेप, दावे, हरकती असल्यास तसेच सर्वेक्षणाच्या वेळेस जी कुटुंबे वगळली आहेत, अशा कुटुंबांचा नव्याने समावेश करण्यासाठी १७ एप्रिलपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर पंचायतस्तरीय अधिकार्‍यांकडे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यात ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी यांचा समावेश आहे. त्यानंतर प्राप्त आक्षेप व हरकती यावर प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रल्हाद हिरामणी (जुन्नर, वडगाव आनंद), गटविकास अधिकारी सचिन घाडगे (ओतूर, बेल्हे), बालविकास प्रकल्प अधिकारी रवींद्र तळपे (आपटाळे, डिंगोरे, राजूर), सहायक गटविकास अधिकारी नम्रता जगताप (नारायणगाव, निमगाव-सावा) यांची महसूल मंडलनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.
तरी कुटुंबप्रमुखांनी प्रारूप याद्यांचे अवलोकन करून स्वत:च्या कुटुंबाची माहिती पडताळून त्यावर काही आक्षेप अथवा दावा असल्यास विहित नमुन्यात अर्ज भरून अचूक माहिती सदर करावी, असे घाडगे यांनी सांगितले

महत्वाची चौकट - ................
देशात पहिल्यांदाच अशाप्रकारची जनगणना करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये शासनाला राज्यातील सर्व जिल्‘ांतील सर्व जातीनिहाय लोकसंख्येचा अंदाज लावण्यासाठी तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची माहिती एकत्रित करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षण २०११ ची कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक घरोघर जाऊन, कुटुंबाची सामाजिक, आर्थिक स्थितीवर माहिती घेण्यात आली आहे. यातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची यादी अद्ययावत करण्याचाही उद्देश आहे.