शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर! मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल: महाराष्ट्र सरकारला नोटीस

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळणाऱ्या महाराष्ट्रातील २ हजार ७३१ शेतकऱ्यांच्या आश्रितांना राज्य सरकारकडून अद्यापही कुठलीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे़ आयोगाने यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली असून दोन आठवड्यात याचे उत्तर देण्याचे बजावले आहे़
प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारावर आयोगाने ही नोटीस बजावली आहे़ गत चार वर्षांत आत्महत्या करणाऱ्या २७३१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नियमाअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतची लहानशी मदतही दिली गेलेली नाही़ यावर आयोगाने आपल्या नोटीसमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ राज्य सरकारकडून याआधीही अशाच प्रकारच्या पाच अन्य प्रकरणांबाबत माहिती मागण्यात आली होती़ मात्र राज्य सरकारने ही माहिती अद्याप दिलेली नाही, याकडेही आयोगाने लक्ष वेधले आहे आहे़
संबंधित नोटीसमध्ये आयोगाने एका सामाजिक कार्यकर्त्याने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत राज्य सरकारकडून मागितलेल्या आकडेवारीचा हवाला दिला आहे़ त्यानुसार, सन २०११ मध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतील ५६९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ यापैकी २७३१ शेतकऱ्यांच्या विधवांना अद्यापही कुठलीही मदत दिली गेलेली नाही़ आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्यांनी पिकासाठी बँकेचे कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नव्हते किंवा त्यांच्याकडे जमीन नव्हती, या सबबीवर त्यांना सरकारी मदत नाकारण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आश्रितांना नुकसानभरपाई देण्याच्या विद्यमान नियमांची तात्काळ समीक्षा करण्याची गरज संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांने व्यक्त केली आहे़