शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

बनावट रेमडेसिविर; विहिंप नेत्यासह तिघांवर गुन्हा, एक लाख इंजेक्शन्सचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 5:55 AM

या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करा, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विवेक तनखा यांनी केली आहे.

जबलपूर (मध्यप्रदेश) : बनावट रेमडेसिविर इंजेक्शन्स विकल्याच्या आरोपावरून जबलपूर विश्व हिंदू परिषदेचा अध्यक्ष आणि इतर दोन जणांवर जबलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना महामारीच्या संकटात रुग्णांना वाचवण्याच्या प्रयत्नांतील त्यांच्या नातेवाईकांना  एक लाखांपेक्षा जास्त ही बनावट इंजेक्शन्स विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सरबजीत सिंग मोखा, देवेंदर चौरसिया आणि स्वपन जैन अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर संबंधित कायद्यातील  कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे, असे जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहित काशवाणी यांनी म्हटले. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करा, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विवेक तनखा यांनी केली आहे. सरबजीत सिंग मोखा यांच्या मालकीचे सिटी हॉस्पिटल आहे. चौरसिया हे मोखा यांचे व्यवस्थापक असून स्वपन जैन हे औषध कंपन्यांची डिलरशीप पाहतात. जैन यांना सूरत पोलिसांनी अटक केली तर मोखा व चौरसिया फरार आहेत.वरिष्ठ सूत्रांनुसार मोखा हे सरकारमधील वरिष्ठ मंत्र्याच्या मुलाच्या संपर्कात होते. त्यांनी इंदूरहून ५०० बनावट रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवली आणि स्वत:च्याच रुग्णालयातील रुग्णांना ३५ ते ४० हजार रूपयांना विकली.देशात कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी मागणी असल्यामुळे टंचाई निर्माण झालेली आहे. त्याचा फायदा उठवत काही लोक काळ्या बाजारात हे रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करीत आहेत. सरकारने इंजेक्शनचे दर जाहीर केलेले असले तरी मोठ्या पैशाच्या आमिषाने बनावट रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करून हजारो रुपयांची माया जमविणाऱ्या टोळ्या सध्या अनेक ठिकाणी कार्यरत आहेत.

५०० बनावट रेमडेसिविर इंजेक्शन्स इंदूरहून  मिळवली. ३५ ते ४० हजार रुपयांना स्वत:च्याच रुग्णालयातील रुग्णांना विकली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या