शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मोठ्या संख्येत Facebook ‌डिलीट करत आहेत लोक, शेअरची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 11:50 IST

सोशल मीडियात लोकप्रिय असणा-या फेसबुक कंपनीची परिस्थिती सध्या बिकट अवस्थेत आहे. शेअर मार्केटमध्ये फेसबुकचे शेअर खाली घसरले आहेत. तर, दुसरीकडे फेसबुकवर सतत ऑनलाइन असणारे लोक आणि कंपन्यांनी आपले पेज डिलीट करत आहेत. त्याचबरोबर, या कंपन्या फक्त आपले फेसबुकवरील पेज डिलीटच करत नाहीत तर फेसबुकच्या माध्यमातून दिल्या जाणा-या जाहिराती बंद करत आहेत. 

ठळक मुद्देफेसबुक कंपनीची परिस्थिती सध्या बिकट अवस्थेतशेअर मार्केटमध्ये फेसबुकचे शेअर जवळपास 13 टक्कांनी घसरले अनेक कंपन्यांनी डिलीट केले फेसबुक पेज

नवी दिल्ली : सोशल मीडियात लोकप्रिय असणा-या फेसबुक कंपनीची परिस्थिती सध्या बिकट अवस्थेत आहे. शेअर मार्केटमध्ये फेसबुकचे शेअर खाली घसरले आहेत. तर, दुसरीकडे फेसबुकवर सतत ऑनलाइन असणारे लोक आणि कंपन्यांनी आपले पेज डिलीट करत आहेत. त्याचबरोबर, या कंपन्या फक्त आपले फेसबुकवरील पेज डिलीटच करत नाहीत तर फेसबुकच्या माध्यमातून दिल्या जाणा-या जाहिराती बंद करत आहेत. सीएनबीसी डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात फेसबुकच्या उत्पन्नात जवळपास 75 अब्ज यूएस डॉलर इतका तोटा झाला आहे. यामध्ये भारतीय रुपयांच्या आकडेवारीनुसार 4875 अरब रुपयांचा तोटा फेसबुकला गेल्या आठवड्यात झाला आहे आणि अद्यापही तोटा होत आहे. याचबरोबर, शेअर मार्केटमध्ये फेसबुकचे शेअर जवळपास 13 टक्कांनी घसरले आहेत. फेसबुकच्या एका शेअरची किंमत रविवारी फक्त 159.39 यूएस डॉलर इतकी होती. दरम्यान, शेअर मार्केटमध्ये फेसबुकची अशा प्रकारची स्थिती 2012 मध्ये सुद्धा झाली नव्हती. त्यावेळी पण काही प्रमाणात घसरण झाली होती. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, 2012मध्ये न्यूयॉर्कमध्ये शेअरची किंमत 11 टक्कांनी घटल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आतापर्यंत सर्वात खाली म्हणजेच 23.94 डॉलरवर घसरला होता. याचबरोबर, फेसबुकवर डेटाचोरीच्या प्रकरणामुळे नामुष्कीची वेळ आली आहे. याप्रकरणामुळे नामांकित कंपन्या फेसबुकवरील आपले पेज डिलीट करत आहेत. टेस्ला, स्पेस एक्स, कॉमर्ज बॅंक आणि मोजला यासारख्या कंपन्यांनी  आपले फेसबुकवरील पेज डिलीट केले आहे. तसेच, अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी फेसबुकला लोकांविषयींची माहिती सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.  तसेच, गूगलवर फेसबुकवरील आपले अकाउंट कशाप्रकारे डिलीट करावे, यासाठी मोठ्याप्रमाणात सर्च करण्यात येत आहे.   दरम्यान, अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली आहे. 

फेसबुक लॉग इनची माहिती विकली जाते फक्त ३४० रुपयांतफेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्यासाठी अमूल्य असणारे फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ ३४० रुपयांना विकले जात असल्याचे एका कंपनीने निदर्शनास आणले आहे. अमेरिकेतील निवडणुकीसाठी ५ कोटी फेसबुक युजर्सचे लॉग इन डिटेल्स चोरण्यात आले होते. ही माहिती जर वरील किमतीला विकली असेल तर त्याचे मूल्य जवळपास १७०० कोटी रुपये एवढे आहे.

'स्पेस एक्स'नं FB पेज केले डिलीटफेसबुक डेटा चोरी प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने एलॉन मस्क यांना फेसबुकवरील 'स्पेस एक्स'चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनीदेखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला जोर का झटका दिला आहे. 'आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले. फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने कंपनीला फटका बसणार नाही, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया