शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पाकव्याप्त काश्मीरमधील स्मारकांच्या छायाचित्रांचे दिल्लीत प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 6:01 AM

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची चर्चा होत असतानाच केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने पाकव्याप्त काश्मीरमधील स्मारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन दिल्लीत आयोजित केले

- नितीन नायगावकर नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची चर्चा होत असतानाच केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने पाकव्याप्त काश्मीरमधील स्मारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन दिल्लीत आयोजित केले असून, यात शिवमंदिर, रामकोट किल्ल्यासारखी स्थळे भेट देणाऱ्यांचे लक्ष वेधत आहेत.पाकव्याप्त काश्मीर हा सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय आहे. तेथील संस्कृती, परंपरा, स्मारके आदींचा प्रत्यक्ष अनुभव मोजक्या लोकांच्या वाट्याला आला. मात्र, पुरातत्व विभागाने भारताचा दीडशे वर्षांचा इतिहास जतन करून ठेवला आहे. यात पाकव्याप्त काश्मीरमधील हिंदू मंदिरे, आकर्षक किल्ले, ऐतिहासिक स्थळांचाही समावेश आहे.राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या कलादालनात हे प्रदर्शन सुरू असून, त्याचा गुरुवारी समारोप होईल. गिलगीट-बाल्टिस्तान येथे भव्य खडकावर कोरलेली बुद्धाची प्रतिमा, एका खडकावर कोरलेले हिंदू देवी-देवतांचे शिल्प विशेष लक्ष वेधून घेतात. गाखर समुदायाच्या सुलतान मुजफ्फर खान याच्या काळात १६ व्या शतकात मुजफ्फराबाद येथे लाल किल्ला बांधण्यात आला. रामकोट किल्ला नावाने तो ओळखलाजातो.दोन्ही मंदिरे भग्नावस्थेतमहाराजा गुलाब सिंह यांनी मीरपूर खासमध्ये रघुनाथ मंदिर उभारले होते, १७ व्या शतकात याच मीरपूरमध्ये शिवमंदिर बांधण्यात आले होते. या दोन्ही मंदिरांची भग्नावस्थेतील छायाचित्रे इथे आहेत. अलेक्झांडर व पोरस यांच्यातील सर्वाधिक गाजलेले युद्ध याच मीरपूर खासमध्ये झाले होते. मीरपूरमध्ये पूर्वी केवळ हिंदू राहायचे.फाळणीपूर्वीचा इतिहासफाळणीपूर्वीच्या भारताची पुरातत्वीय संस्कृती व इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आपल्या वैभवशाली इतिहासाबाबत लोकांमध्ये जागरूकता असावी, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.-नवनीत सोनी,सदस्य सचिव,राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण