शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

... तर खालशांच्या २०० साधू-महंतांचे शाहीस्नानावर बहिष्कार

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

नाशिक : पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणार्‍या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. सदर नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नान बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे.

नाशिक : पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणार्‍या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. सदर नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नान बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे.
पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन भाविकांसाठी सुरक्षा होती की, कर्फ्यु होता हेच कळले नसल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या बॅरिकेडिंगमुळे भाविकांना शाहीस्नानासाठी कोसो दूर पायपीट करावी लागली. इतर ठिकाणीही कुंभमेळा भरतो. त्याठिकाणचे पोलिसांकडून भाविकांना त्रास होईल, असे नियोजन केले जात नसल्याचे त्यांनी म्हटले. रामकुंड व साधुग्रामपासून दहा किलोमीटरच्या जवळपासचे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने भाविकांना शाही मिरवणुकीचे दर्शनही झाले नाही. त्यामुळे स्थानिक व परराज्यातून येणार्‍या भाविकांकडून नाराजी व्यक्तकेली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी पुढील पर्वणी काळात भाविकांची गैरसोय होऊन नये, भाविकांची कमीत कमी पायपीट होऊन योग्य नियोजन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. सुरक्षेला विरोध नाही, सुरक्षा पाहिजेच, मात्र भाविकांचे हाल होणार नाहीत यांचा विचार होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाविकांची श्रद्धा असल्याने कुंभमेळ्यात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. भाविकांच्या अडचणी वाढल्यास संख्या अजून घटणार आहे. त्यामुळे नियोजनात बदल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी दीपंेद्रसिंह कुशवाह यांना भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
इन्फो :
पर्वणी काळात बससेवा हवी
परराज्यातून येणार्‍या भाविकांना रस्त्यांची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे स्नानाचा घाट व रस्ता त्यांना समजत नाही. पायपीट जास्त करावी लागल्याने शाहीस्नान न करताच भाविकांना परतण्याची वेळ आली. वृद्ध, मुलांना एवढे अंतर चालत जाणे शक्य होत नाही. त्यासाठी शहर बससेवा सुरू ठेवण्यात यावी.