शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

Bhajanlal Sharma : "ही देवाची कृपा, जनतेसाठी खूप काम करेल"; भजनलाल शर्मा यांच्या आई-बाबांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 11:21 IST

Bhajanlal Sharma : भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्याच्या कुटुंबात आनंद आणि उत्सवाचे वातावरण होते.

भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. भजनलाल शर्मा हे पहिल्यांदा सांगानेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा मूळचे भरतपूरमधील नदईचे आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या कुटुंबात आनंद आणि उत्सवाचे वातावरण होते. भजनलाल शर्मा यांचे वडील किसन स्वरूप शर्मा म्हणाले, "मुलगा मुख्यमंत्री झाला आहे. खूप आनंद झाला आहे. ही सर्व देवाची कृपा आहे. कुटुंबीयांना अशी कोणतीही आशा नव्हती. परंतु जेव्हा देवाची इच्छा असते तेव्हा काहीही घडू शकतं."

भजनलाल शर्मा यांची आई गोमती देवी यांनी देखील य़ावर प्रतिक्रिया दिली आहे. "मुलगा मुख्यमंत्री झाला आहे. खूप चांगलं वाटतंय. मुख्यमंत्री होऊन लोकांसाठी चांगलं काम करेल. विकासाची कामं करेल. तो खूप मेहनती आहे. जनतेसाठी खूप काम करेल. तो बर्‍याच काळापासून राजकारणात होता. त्याने खूप परिश्रम घेतले आहेत" असं आईने म्हटलं आहे. NDTV ने भजनलाल शर्मा यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत कोट्यवधींचे मालक! संपत्ती आणि कर्ज किती? जाणून घ्या...

भजनलाल शर्मा हे करोडपती आहेत आणि त्याची एकूण संपत्ती 1.40 कोटी रुपये आहे, तर 35 लाखांचं कर्ज आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संपत्तीच्या तपशिलाशी संबंधित प्रतिज्ञापत्रानुसार, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या एकूण संपत्तीपैकी 1,15,000 रुपये रोख आहेत, तर विविध बँकांमधील खात्यामध्ये जवळपास 11 लाख रुपये आहेत. 

शर्मा यांच्याकडे तीन तोळं सोनं आहे, ज्याची किंमत 1,80,000 रुपये आहे. त्यांनी शेअर्स किंवा बाँड्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, परंतु त्यांच्याकडे LIC आणि HDFC Life च्या दोन विमा पॉलिसी आहेत, ज्यांची किंमत 2,83,817 रुपये आहे. याशिवाय वाहनांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या नावावर टाटा सफारी आहे, ज्याची किंमत पाच लाख रुपये प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे, याशिवाय एक टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल असून ज्याची किंमत  35,000 रुपये आहे.
 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा