१९० जागा मिळाल्या तरी भाजप उत्तर प्रदेशात सत्ता टिकवू शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 10:38 AM2021-12-16T10:38:11+5:302021-12-16T10:39:26+5:30

UP Election : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोक दल, बसप आणि काँग्रेस शाबूत राहू शकणार नाही, असा दावा राज्यातील भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी केला आहे.

Even if BJP gets 190 seats it can retain power in Uttar Pradesh | १९० जागा मिळाल्या तरी भाजप उत्तर प्रदेशात सत्ता टिकवू शकते

१९० जागा मिळाल्या तरी भाजप उत्तर प्रदेशात सत्ता टिकवू शकते

Next

व्यंकटेश केसरी

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीत १९० जागा मिळाल्या तरी भाजप उत्तर प्रदेशात सत्ता टिकवू शकते. कारण, विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोक दल, बसप आणि काँग्रेस शाबूत राहू शकणार नाही, असा दावा राज्यातील भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी केला आहे.  सरकारविरोधी भावनेचा भाजपच्या निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी मान्य केले आहे.

३२५ जागा जिंकून भाजप सहज सरकार स्थापन करील, असा दावा भाजप नेते करीत असले तरी सरकारविरोधी भावना या घटकाकडे दुर्लक्ष करता येेऊ शकत नाही, असे या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्यात काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केल्याने हिंदुत्व  उत्तर प्रदेशसह देशभरात निश्चितच भक्कम झाले आहे. मध्य उत्तर प्रदेशात (अवध) आणि बुंदेलखंडमध्ये  भाजप आपले वर्चस्व राखू शकते. शेतकरी आंदोलनामुळे  राष्ट्रीय लोकदल समाजवादी पार्टीवर मदत होत असली तरी शेतकरी नेत्यांपेक्षा तेच लाभधारक आहेत, असे मत जाट समुदायाच्या एका भाजप नेत्याने व्यक्त केले. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाला फारसे महत्त्व देत नाहीत.  

आगामी सार्वत्रिक निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही, असे त्यांचे मत आहे. तथापि, जागा घटल्या, तर पक्ष कार्यकर्त्यांच्या नैतिक बळावर परिणाम होईल, या भीतीपोटी भाजप या निवडणुकीला अधिक महत्त्व देत आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या सभांना लक्षणीय गर्दी होत आहे. त्यांनी अनेक इच्छुकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. परंतु, मुस्लिम आणि यादव समुदायापलीकडे त्यांना आपल्या पक्षाचा जनाधार वाढविता आलेला नाही, असे भाजपच्या एका नेत्याने आणि माजी खासदाराने सांगितले. रालोद, बसप आणि  काँग्रेस या राज्यांतील तीन पक्षांची स्थिती कमकुवतच असल्याने निवडणुकीनंतर त्यांच्यात फूट पडू शकते, असेही या नेत्याने सांगितले.

Web Title: Even if BJP gets 190 seats it can retain power in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.