शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

...तर दिल्लीतही मिळणार नाही रुग्णांना खाटा!, केजरीवाल यांनी केली लॉकडाऊन घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 07:14 IST

Kejriwal announces lockdown : दिल्लीत बुधवारी १७ हजारांवर रुग्णांची नोंद झाली, तर शंभरावर रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज दोन ते चार हजार रुग्णांची भर पडत आहे. दीड महिन्यांपूर्वी दिल्लीत एक ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होता.

नवी दिल्ली : दिल्लीत ज्या वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ती गती कायम राहिली तर येत्या आठवड्याभरातच रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळणार नाहीत. दिल्लीत कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांंनी शुक्रवारी रात्रीपासून तर सोमवारी सकाळपर्यंत दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.दिल्लीत बुधवारी १७ हजारांवर रुग्णांची नोंद झाली, तर शंभरावर रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज दोन ते चार हजार रुग्णांची भर पडत आहे. दीड महिन्यांपूर्वी दिल्लीत एक ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होता. केजरीवाल म्हणाले, लॉकडाऊनच्या विरोधात मी आहे. परंतु, स्थिती पाहता लॉकडाऊन शिवायपर्याय नाही. यामुळे रुग्ण कमी होतील, असे नाही तरी ज्या गतीने दिल्लीत दररोज हजारो रुग्ण येत आहेत ती गती मंदावू शकते. दिल्लीतील रुग्णालये भरलेली असली तरी आज पाच हजार खाटा आणि ५०० आयसीयू बेड्स रिक्त आहेत. अनेक बँक्वेट हॉल रुग्णांलयांशी जोडण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुुरू आहेत. परंतु, लोकांनीही नियमांचे पालन करावे.केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणा केली. 

प्लाझ्मा दान करा ! दिल्लीतील रुग्णांना प्लाझ्मा मिळत नाही. केजरीवाल सरकारने प्लाझ्मा बँक सुरू केली असली तरीही प्लाझ्मा दाते नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. केजरीवाल यांनी प्लाझ्मा दान करण्याचे दुरुस्त झालेल्या रुग्णांना आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवाल