वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:12+5:302015-02-18T00:13:12+5:30

अर्धापूर : तालुक्यातील दाभड येथील ऑक्सफर्ड इंग्लीश मिडीयम स्कूलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते़

Enjoy the annual affection | वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

्धापूर : तालुक्यातील दाभड येथील ऑक्सफर्ड इंग्लीश मिडीयम स्कूलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते़
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकरराव टेकाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्धवराव राजेगोरे, गोविंद गोदरे, शिवाजीराव जिंके उपस्थित होते़ कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेस पूष्पहार व दीप प्रज्वलनाने झाली़ प्राचार्य रवि सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले़ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लावणी, कोळीगीत, हिंदी व मराठी लोकगीते व बहारदार नृत्ये सादर केली़ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित प्रेक्षक भारावरून गेले़ यावेळी मारोतराव गव्हाणे, किशनराव कदम, चंद्रकांत सरपाते, गंगाधर टेकाळे, बाबुराव राजेगोरे, उत्तम टेकाळे, बालाजी शिंदे, मुख्याध्यापक रामराव देवणे, बाबुराव टेकाळे यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन प्रा़दत्तात्रय टेकाळे यांनी तर आभार केशव दादजवार यांनी मानले़
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामकृष्ण लोखंडे, ऋतिका सूर्यवंशी, जीवन कपाटे, रविना राजेगोरे, सुप्रिया राजेगोरे, राधा पांचाळ, दिपाली सूर्यवंशी, स्नेहलता जमदाडे, पिंटू राजेगोरे, ग्यानू बनसोडे यांनी परिश्रम घेतले़

Web Title: Enjoy the annual affection