शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:57 IST

उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर ६२मध्ये राहणाऱ्या एका इंजिनियर तरुणाला अशाच डेटिंग अ‍ॅपमधून तब्बल ६६ लाखांचा चुना लागला आहे.

सध्या सायबर क्राइमची प्रकरणे देशभरात वाढत आहेत. एकीकडे सायबर गुन्हेगार वृद्धांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून किंवा ओटीपी स्कॅम करून लुबाडत आहेत, तर दुसरीकडे तरुणाईला डेटिंग अ‍ॅप्सच्या जाळ्यात अडकवून चुना लावला जात आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर ६२मध्ये राहणाऱ्या एका इंजिनियर तरुणाला अशाच डेटिंग अ‍ॅपमधून तब्बल ६६ लाखांचा चुना लागला आहे. टिंडरवर जुळलेले मैत्रीचे धागे त्याला अक्षरश: कंगाल करून गेले आहेत. या डेटिंग अ‍ॅपवरून त्याची एका तरूणीशी मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात प्रेमाचे बंध निर्माण होऊ लागले आणि इथूनच त्याच्या खात्यातील पैश्यांना सुरुंग लागण्यास सुरुवात झाली. 

नोएडा सेक्टर ६२मध्ये राहणाऱ्या इंजिनियर कपिलसोबत ही घटना घडली आहे. २०२३मध्ये टिंडर या डेटिंग अ‍ॅपचा वापर करत असताना त्याला शुभांगी नावाच्या एका महिलेकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानेही ती रिक्वेस्ट स्वीकारून तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. गप्पांच्या ओघात त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलू लागले. सुरुवातील डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून होणाऱ्या त्यांच्या गप्पा आता मोबाईल नंबर एकमेकांशी शेअर केल्यानंतर फोनवर सुरू झाल्या होत्या. 

भेटही झाली नाही अन्... 

दोघेही रोज एकमेकांशी गप्पा मारत होते. मात्र, अद्याप त्यांची एकही भेट झाली नव्हती. तरीही त्यांच्यातील प्रेम बहरत चालले होते. एकदिवशी शुभांगीने त्याला आपली नोकरी सुटल्याचे सांगितले. तसेच, आपण आजारी असल्याचेही ती म्हणाली. डॉक्टरचा बहाणा सांगून तिने कपिलकडे काही पैसे मागितले. कधी ५०० तर कधी १०००,१५०० असे पैसे कपिल ट्रान्सफर करतच होता. कित्येक दिवस हा पैसे मागण्याचा प्रकार सुरू होता. एकेदिवशी शुभांगीच्या कुटुंबातील व्यक्ती आणि वकील असल्याची बतावणी करून कपिलला धमकावण्याचा प्रकार सुरू झाला. आमची मुलगी आजारी पडली, त्याला तूच कारणीभूत आहेस, असे म्हणत कपिलकडून पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, कपिलने विरोध करताच त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. 

२ वर्षांत केले २९४ वेळा पैसे ट्रान्सफर

घाबरलेल्या कपिलने पैसे देणे सुरूच ठेवले. २ वर्ष हा प्रकार सुरू होता. हळूहळू पैशांची रक्कम वाढू लागली. आता मात्र कपिलच्या खत्यातील पैसे संपू लागले होते. त्यामुळे कपिलने पैसे देणे बंद केले. पैसे थांबताच पुन्हा धमक्या सुरू झाल्या. मात्र, यावेळी कपिलने पोलिसांत जाण्याचे धाडस दाखवले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन वर्षांच्या या काळात कपिलने तब्बल २९४ वेळा पैशांची देवाणघेवाण करत ६६.२२ लाख रुपये गमावले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tinder Girlfriend Scam: Engineer Loses Fortune in Online Dating Trap

Web Summary : An engineer from Noida lost ₹66 lakh after falling for a woman on Tinder. She feigned illness and extorted money over two years, later threatening him through fake family members. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश