जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 06:06 IST2025-09-09T06:05:00+5:302025-09-09T06:06:57+5:30
अन्य एका घटनेत बीएसएफने जम्मूच्या आरएस पुरामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाला जेरबंद केले.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
-सुरेश एस. डुग्गर, श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले. त्यापैकी दोन जवान शहीद झाले.
दरम्यान, अन्य एका घटनेत बीएसएफने जम्मूच्या आरएस पुरामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाला जेरबंद केले. गड्डार वनभागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर चकमकीला तोंड फुटले.
अतिरेक्यांशी लढताना दोन जवान शहीद
मिळालेल्या माहितीच्या आधारे, भारतीय लष्कराच्या ९ आरआर, पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल यांनी जंगलात संयुक्त शोधमोहीम सुरू केली.
सतर्क सैन्याने संशयास्पद हालचाली टिपल्या आणि दहशतवाद्यांना आव्हान दिले. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. नंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.
यात दोन दहशतवादी ठार झाले तर एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरसह एक जवान शहीद झाला.