शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2017 - ..म्हणून राम मंदिराचा मुद्दा पडला अडगळीत

By admin | Updated: February 28, 2017 16:48 IST

जवळपास अडीच दशकांपूर्वी भाजपाने अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा हाती घेतला. या विषयातील भावनिक गुंतणवूक आणि मतविभाजन लक्षात घेऊन भाजपाने...

 ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 28 - जवळपास अडीच दशकांपूर्वी भाजपाने अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा हाती घेतला. या विषयातील भावनिक गुंतणवूक आणि मतविभाजन लक्षात घेऊन भाजपाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षविस्तार केला आणि  केंद्रासह अनेक राज्यांची सत्ता मिळवली. पण नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने राम मंदिराच्या विषयाला प्रमुख मुद्दा बनवण्याचे टाळले किंवा तो विषय विरोधकांकडून ऐरणीवर येणार नाही याची काळजी घेतली. 
 
'मंदिर वही बनाऐंगे' ही काहीवर्षांपूर्वीची भाजपाची भूमिका वेळेनुसार सौम्य झाली आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिराला स्थान दिले असले तरी, संवैधानिक चौकटीत राहून राम मंदिराचे निर्माण करु असे म्हटले आहे. याचे कारणही तसेच आहे. संवेदनशील विषयांवर भावानांचा खेळ करुन सत्ता मिळवण्याच्या पक्षीय राजकारणाला मतदार आता थारा देत नाहीत. जो विकासाची भाषा बोलतो त्याच्या पाठिशी मतदार उभे राहतात. त्यामुळे भाजपाने उत्तरप्रदेशच्या प्रचारात विकासाच्या मुद्यावर भर दिला. 
 
उत्तरप्रदेशच्या राजकारणात मुस्लिम मतेही निर्णायक ठरतात. पण भाजपाने मुस्लिम मतदारांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न न करता अन्य मतदारांवर जास्त भर दिला आहे. आपण जातीयवादाच्या बाजूने आहोत हा संदेश जाऊ नये यासाठी भाजपाने खासदार योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज या कट्टर हिंदुत्वाच्या चेह-यांना पोस्टरबॉय बनवण्याचे टाळले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाताही विकासाचाच मुद्दा होता. हिंदुत्वाचा मुद्दा कितपत उत्तरप्रदेशात चालेल याची चाचपणी भाजपाने 2014 मध्येच केली होती. 2014 साली भाजपाने केंद्राची सत्ता  मिळवल्यानंतर उत्तरप्रदेशात काही जागांवर पोटनिवडणूका झाल्या होत्या. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांना आक्रमक भाषणे करायला मुक्तवाव दिला होता. पण त्याने भाजपाच्या पदरात फारसे काही पडले नाही. मतदारांनी समाजवादी पक्षाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे भाजपाने राम मंदिराला प्रमुख मुद्दा बनवण्याचे टाळले.