शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Shocking: लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू, दोन दिवसांनंतर आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:49 IST

Gujarat Valsad Lift Accident: गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील एका निवासी सोसायटीमध्ये लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू झाला.

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील एका निवासी सोसायटीमध्ये लिफ्टचा अत्यंत धक्कादायक अपघात घडला आहे. लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडल्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला. लिफ्टच्या शाफ्टमधून दुर्गंधी येऊ लागल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्टची केबिन मजल्यावर नसतानाही दरवाजा उघडल्याने हा भीषण अपघात घडल्याचे समोर आले. याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वलसाडमधील निर्मल सोसायटीमध्ये घडली. माळी म्हणून काम करणारी एक वृद्ध व्यक्ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टची वाहत पाहत होते. यावेळी तांत्रिक बिघाडामुळे लिफ्टची केबिन त्या मजल्यावर नसतानाही लिफ्टचा दरवाजा उघडला गेला. अंधार असल्याने समोर लिफ्ट आल्याची समजून त्यांनी आत पाऊल टाकले आणि खाली कोसळले. हा अपघात घडला तेव्हा आसपास कोणीही नसल्यामुळे ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. दोन दिवसांनंतर सोसायटीमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरू लागल्याने रहिवाशांना संशय आला. त्यांनी तपास केला असता लिफ्टच्या खाली शाफ्टमध्ये या वृद्धाचा मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत आढळून आला.

पोलिसांची कारवाई आणि सीसीटीव्ही फुटेज

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हा सर्व प्रकार तांत्रिक बिघाडामुळे आणि लिफ्टच्या देखभालीअभावी झाल्याचे स्पष्ट झाले. लिफ्टच्या इंटरलॉक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने केबिनशिवाय दरवाजा उघडला गेला. याप्रकरणी वलसाड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, लिफ्टच्या मेंटेनन्ससाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू केली.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे रहिवासी सोसायट्यांमधील लिफ्टच्या सुरक्षेचा आणि नियमित देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लिफ्टची वेळेवर तपासणी न करणे जीवावर बेतू शकते, हेच या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Elderly Man Dies After Falling into Lift Shaft in Valsad

Web Summary : In Valsad, an elderly man died after falling into a lift shaft due to a technical malfunction. The lift door opened without the cabin present. His body was found after two days, raising safety concerns about lift maintenance.
टॅग्स :Gujaratगुजरात