शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: “पुढील महिन्यापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव; १५ मे नंतर जास्त धोकादायक”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 11:28 IST

सरकारने उद्योग उत्पादन क्षमतेला वाचवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नाही असं के वी सुब्रमण्यम म्हणाले.

नवी दिल्ली- देशात कोरोनामुळं परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यातही कायम राहू शकते. मेच्या पहिल्या पंधरवड्यात याचा परिणाम खूप जाणवू शकतो असा इशारा मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. वी सुब्रमण्यम यांनी दिला आहे. देशात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील २४ तासांत २ लाख ९५ हजाराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर २ हजारापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.

के. वी सुब्रमण्यम म्हणाले की, मी महामारीचा अभ्यासक नाही. मी फक्त यावर नजर ठेऊन आहे. मी एपिडेमियोलॉजिस्टचे अनेक पेपर वाचले आहेत. आयआयटी कानपूरने चांगल्या मॅथेमेटिकल मॉडलिंगच्या आधारे आयसीएमआरसारख्या संस्थांच्या रिसर्च आधारे मी सांगू शकतो की, भारतात कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असेल.

न्यूज एजेन्सी पीटीआयच्या नुसार, ग्रेट लेक्स इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटद्वारा आयोजित एका कार्यक्रमात के. वी सुब्रमण्यम बोलत होते. या संकटाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर जास्त होणार नाही. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मे पर्यंत राहील असं इंडियन मेडिकल रिसर्चसारख्या अनेक संस्थांच्या रिपोर्टवर आधारित सांगतो. सरकारने उद्योग उत्पादन क्षमतेला वाचवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नाही असं के वी सुब्रमण्यम म्हणाले.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १,५६,१६,१३० वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (२१ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत२,९५,०४१ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख ८२ हजारांवर पोहोचला आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत १२,७१, ००,०००  हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही १.१८ टक्के इतका कमी झाला आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या