शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Mahua Moitra: टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 22:03 IST

Mahua Moitra : 11 मार्च रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

ED summonsTMC leader Mahua Moitra for questioning in FEMA case (Marathi News) नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. पैसे घेऊन प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात (कॅश फॉर क्वेरी) आधीच त्यांची खासदारकी गेली आहे. त्यातच आता महुआ मोईत्रा या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. ईडीने महुआ मोईत्रा यांना फेमा उल्लंघन प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स बजावले आहे. त्यांना 11 मार्च रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. 

याआधी ईडीने महुआ मोईत्रा यांना समन्स पाठवून 19 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, महुआ मोईत्रा यांनी तपासात सहभागी होण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ मागितला होता. गेल्या महिन्यात महुआ मोईत्रा यांनी ईडीला पत्र पाठवून हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती. आता महुआ मोईत्रा यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवले असून 11 मार्च रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अक्ट (फेमा) अंतर्गत दाखल प्रकरणात ईडीला महुआ मोईत्रा यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवायचा आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

या प्रकरणात इतर काही परदेशी निधी हस्तांतरित करण्याव्यतिरिक्त एनआरई खात्यांशी संबंधित व्यवहार ईडीकडून तपासला जाणार आहे. तसेच, सीबीआयही या प्रकरणाचा तपास करत असून लोकपालही महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करत आहेत. सीबीआय प्रकरणाच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पैसे घेऊन प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात आधीच त्यांची खासदारकी गेली आहे. महुआ मोईत्रा यांची खासदारकी लोकसभेच्या एथिक्स कमिटीच्या शिफारशीनुसार रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सदस्यांसाठीच्या पोर्टलचे पासवर्ड व युझर आयडी इतरांना दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय