20 लाख रुपयांची लाच घेताना इडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं, सत्य शोधण्याच्या कामाला लागली एजन्सी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 07:28 PM2023-12-01T19:28:11+5:302023-12-01T19:30:14+5:30

दिंडीगुल जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मदुराई येथील डीव्हीएसी शाखेकडून या घटनेसंदर्भात माहिती मिळाली असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ED officer caught red-handed while taking Rs 20 lakh bribe, agency begins work to find truth | 20 लाख रुपयांची लाच घेताना इडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं, सत्य शोधण्याच्या कामाला लागली एजन्सी 

20 लाख रुपयांची लाच घेताना इडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं, सत्य शोधण्याच्या कामाला लागली एजन्सी 

तामिळनाडूमध्ये एका इडीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याचे वृत्त आहे. तामिळनाडूतील सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटल्यानुसार, अंकित तिवारी नावाच्या एका कथित ईडी अधिकाऱ्याला दिंडीगुलमध्ये एका डॉक्टरकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.

ते म्हणाले, "इडी अधिकारी अंकित तिवारीला दिंडीगूलमध्ये एका डॉक्टरकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तो त्याच्या ईडी अधिकाऱ्यांच्या टीमसह अनेक लोकांना धमकावत होता आणि त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयात सुरू असलेला खटला बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत होता.”

तामिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अंकित तिवारीला पकडले आहे. नाव जाहीर न करणाच्या अटीवर एका दुसऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "तो खरोखरच अंमलबजावणी संचालनालयाशी संबंधित आहे की नाही, याचा आम्ही शोध घेत आहोत." दिंडीगुल जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मदुराई येथील डीव्हीएसी शाखेकडून या घटनेसंदर्भात माहिती मिळाली असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

महत्वाचे म्हणजे, या आरोपासंदर्भात ईडीकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे स्पष्टिकरण आलेले नाही. पकडण्यात आलेली व्यक्ती स्वतःला इडीचा अधिकारी सांगत आहे. तो खरो खरच इडीचा अधिकारी आहे का? यासंदर्भात शोध घेतला जात आहे. सरकारकडून अधिकाऱ्यांनी अंकित तिवारीचे आयडी कार्डदेखील सादर केले आहे. हे आयडी कार्ड डिसेंबर 2024 पर्यंत वैध आहे.

Web Title: ED officer caught red-handed while taking Rs 20 lakh bribe, agency begins work to find truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.