शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

भारतात आढळला इबोलाचा पहिला रुग्ण

By admin | Updated: November 19, 2014 09:12 IST

लायबेरियाहून भारतात आलेल्या भारतीय तरुणाच्या (२६) इबोलाच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला दिल्ली विमानतळावरील विशेष जागेत वेगळे ठेवले आहे.

नवी दिल्ली : लायबेरियाहून भारतात आलेल्या भारतीय तरुणाच्या (२६) इबोलाच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला दिल्ली विमानतळावरील विशेष जागेत वेगळे ठेवले आहे. इबोलाचा देशातील हा पहिलाच निश्चित झालेला रुग्ण आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण १० नोव्हेंबर रोजी येथे आला. लायबेरियात त्याच्यावर आधीच उपचार केले होते आणि नंतरच्या तपासणीत त्याच्यात कोणतीही लक्षणे दिसली नव्हती; परंतु त्याच्या वीर्याची येथील तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला स्वतंत्र जागी ठेवले. इबोलाचा रुग्ण बरा होताना त्याच्या शरीराच्या स्रावातून विषाणू बाहेर टाकले जातात. तथापि, या तरुणाच्या वीर्याच्या नमुन्यात आढळलेले विषाणू वैद्यकीयदृष्ट्या तो बरा झाला तरी लैंगिक संबंधाद्वारे ९० दिवसांपर्यंत इबोलाची लागण करू शकतात, असे निवेदनात म्हटले आहे. या तरुणाच्या शरीराच्या स्रावाच्या तपासण्या निगेटिव्ह येईपर्यंत त्याला दिल्ली एअरपोर्ट हेल्थ आॅर्गनायझेशनच्या विशेष आरोग्य केंद्रात वेगळे ठेवले जाईल आणि तो वैद्यकीयदृष्ट्या फिट आढळला, तरच त्याला घरी जायची परवानगी दिली जाईल. हा रुग्ण इबोलाचा म्हणूनच त्याच्यावर उपचार केले जात आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. हा रुग्ण इबोलामुक्त झाला असल्याचे लायबेरियन सरकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्याच्याकडे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.