during the Lok Sabha election shiv sena term and condition of chief minister's, bjp leader says to media | लोकसभेवेळीच होती 'मुख्यमंत्रीपदा'ची बोली, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची कबुली  

लोकसभेवेळीच होती 'मुख्यमंत्रीपदा'ची बोली, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची कबुली  

नवी दिल्ली - मुख्यमंत्री पदावरुन भाजपा-शिवसेनेचं चांगलच बिनसलं आहे. तर, मी खोटं बोलत नसून सत्य जनेतला माहिती आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाकडून फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप' या निकषावर महायुतीकडून निवडणुका लढविण्यात आल्या आहेत. पण, मुख्यमंत्रीपदावरुन या दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेला आहे. 

शिवसेना आणि भाजपाची गेल्या 25 वर्षांपासूनची युती मुख्यमंत्रीपदामुळे संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे. एनडीएमधून शिवसेनेला बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे सेना खासदारांची आसन व्यवस्थाही बदलण्यात आली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन राज्यात महाशिवआघाडी स्थापन होणार असल्याचं दिसून येतंय. शिवसेनेचाच मुख्यमंत्री या धोरणानुसार हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपाला दूर ठेवणार आहेत. मात्र, शिवसेना-भाजपामध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वीच वादाची ठिणगी पडली होती. त्यावेळी, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हा वाद संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता, असे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलंय. 

लोकसभेत भाजपासोबत युती करण्यासाठी शिवसेनेनं भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाची अट घातली होती. मुख्यमंत्रीपद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहांना मध्यरात्री 2 वाजता फोन करुन चर्चा केली होती. तसेच, युती तुटली तर? असा प्रश्नही विचारला होता. अमित शहांसह भाजपाचे काही नेते सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास इच्छुक नव्हते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युती तोडण्यास तयार नव्हते. त्यामुळेच अमित शहा स्वत: मातोश्रीवर आले होते. अमित शहा मातोश्रीवर आल्यानंतर शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंद खोलीत चर्चा झाली होती. या चर्चेवेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते, असेही भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलंय, असे वृत्त हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी वेबसाईटने दिले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: during the Lok Sabha election shiv sena term and condition of chief minister's, bjp leader says to media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.