शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवासाठी सजली देवीची मंदिरे दुर्गोत्सव: धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, घटस्थापनेची जोरात तयारी

By admin | Updated: October 10, 2015 00:45 IST

जळगाव-तीन दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेवल्याने शहरातील देवींच्या मंदिरे सजली असून उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. रंगरंगोटी, परिसर स्वच्छता पूर्णत्वाकडे आली असून कार्यक्रमांचे नियोजनही पूर्ण झाले आहे़

जळगाव-तीन दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेवल्याने शहरातील देवींच्या मंदिरे सजली असून उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. रंगरंगोटी, परिसर स्वच्छता पूर्णत्वाकडे आली असून कार्यक्रमांचे नियोजनही पूर्ण झाले आहे़
भवानी माता मंदिर, कालिंका माता मंदिर आणि इच्छादेवी या प्रमुख मंदिरांमध्ये नवरात्रीमध्ये दर्शनासाठी देवीचे भक्त मोठ्या प्रमाणात येतात़ भक्तांच्या गर्दीने परिसर फुलून जातो़ परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते़ मंगळवारी घटस्थापना असून सकाळी साडेनऊ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्थापनेचा मुहूर्त आहे़

भवानी माता मंदिर, सुभाष चौक
१९२४ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार झाला. त्याकाळात यासाठी १४ हजार ६७५ रूपये इतका खर्च आला होता़ जयपूर येथून सव्वादोन फुटाची देवीची आकर्षक मूर्ती आणण्यात आली होती. उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे़ नवरात्रात पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी सात वाजता नित्य आरती, दहा वाजता श्रीसुक्त म्हणून दुग्धाभिषेक, दुपारी १२ ला शृंगार व नैवेद्य आरती, सायंकाळी पावणेसातला संध्या आरती तर रात्री ११ ला शयन आरती होते. २१ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजेदरम्यान नवचंडी पाठ आयोजित केले असल्याची माहिती मंदिराचे पूजारी महेश त्रिपाठी यांनी दिली़

कालिंका माता मंदिर, भुसावळ रोड
नवरात्री उत्सवात कालिंका माता मंदिर ट्रस्टकडून गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येते़ यंदा देखील मंदिराच्या समोरील मैदानावर गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्षा शैला सरोदे यांनी दिली. नवरात्री उत्सवात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते़ त्यामुळे मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे़ मंदिरात आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे़ घटस्थापनेपासून दहा दिवस मंदिरात दररोज सकाळी साडेसहा वाजता काकडा तर सायंकाळी साडे सहा वाजता सायंआरती होते़ १७ रोजी सकाळी ११ ते १ गीता पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे़ २१ रोजी बुधवारी महाप्रसाद वाटप होणार आहे़
कालिंका माता मंदिरात नवरात्री उत्सवात गेल्या ३० वर्षांपासून ७२ वर्षीय शंकर फुसे स्वयंप्रेरणेने रंगकाम करीत आले आहेत़ यंदादेखील त्यांनीच संपूर्ण मंदिरात रंगकाम केले आहे़ नऊ दिवस त्यांचा मंदिरात मुक्काम असतो़