शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 08:37 IST

विरोधकांनी लोकशाहीवरील विश्वास उडविण्याचे काम केल्याचा पंतप्रधानांचा आरोप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विरोधक लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडविण्याचा आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या निवडणुकीतील विजयावर पराभवाची छाया पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. सत्ताधारी गटाने या निवडणुकीत मोठा विजय मिळवला, असे सांगत त्यांनी आघाडी आणि आकडेवारीच्या संदर्भात पाहिल्यास ‘एनडीए’चे सर्वात मजबूत आघाडी सरकार आहे, अशी ग्वाही दिली. 

संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केल्याबद्दल विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना फटकारले आणि आरोप केले की जर निकाल त्यांना अनुकूल नसेल तर ते देशभरात आगडोंब उसळण्याची भाषा करत होते. तथापि, ईव्हीएमने ४ जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांची बोलती बंद केली. हे निकाल म्हणजे त्यांच्या सरकारच्या अजेंड्याला देशव्यापी पाठिंबा मिळाल्याचा दावा मोदी यांनी केला. 

सर्व निर्णयांमध्ये एकमत साध्य करणे हेच लक्ष्य पुढच्या सरकारच्या सर्व निर्णयांमध्ये एकमत व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आणि एनडीए ही ‘प्रथम राष्ट्र’ या तत्त्वाशी बांधील असलेली एकजीव आघाडी आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. परस्पर विश्वास हा या युतीचा गाभा आहे आणि आपण ‘सर्व पंथ समभाव’ या तत्त्वाशी बांधील आहेत,  असेही त्यांनी सांगितले.

मोदी म्हणाले....इंडिया आघाडी वेगाने रसातळाला जाणार हे स्पष्ट दिसत आहे. विरोधकांचा सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करून निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षांची मानसिकता गेल्या शतकातील. त्यांचा प्रगती, आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा विरोध. मी जगभरात भारत ही ‘लोकशाहीची जननी’ असल्याचा ढोल वाजवत असताना विरोधक मात्र भारतात लोकशाही नसल्याचे जगाला सांगतात. आमची १० वर्षे फक्त ट्रेलर होती. आम्ही देशाच्या विकासासाठी अधिक कठोर आणि वेगाने काम करू.

नऊ नेत्यांनी दिले अनुमोदनसंसदेच्या संकुलाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत भाजपच्या तीन नेत्यांसह मित्रपक्षांच्या नऊ नेत्यांनी मोदींच्या निवडीला अनुमोदन दिले. आपल्या सरकारची धोरणे आणि कार्यक्रम ठळकपणे मांडताना मोदींनी वारंवार ‘एनडीए’चा उल्लेख केला.याशिवाय एनडीएचे सहकारी तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) एन. चंद्राबाबू नायडू आणि जेडी(यू)चे नितीश कुमार यांच्यासह विविध सदस्यांनी आपापल्या राज्यात विकास कसा घडवून आणला याचा उल्लेखही केला. 

काँग्रेसला दशकानंतरही १०० चा आकडा गाठता आला नाही“काँग्रेसला २०१४ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीत आम्हाला मिळाल्या आहेत. दशकानंतरही त्यांना १०० चा आकडा गाठता आलेला नाही, याकडे मोदींनी लक्ष वेधले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल