शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी कालरचालकाची धडक बेधडक रिक्षा, दुचाकीला ठोकरले

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

शिरूर : शहरातून जाणार्‍या पुणे-अहमदनगर रस्त्यावर नगर परिषद प्रसूतिगृहासमोर एका मद्यपी मारुती कारचालकाने बेफामपणे कार चालवून एक रिक्षा व एका दुचाकीला धडक दिली. यात रिक्षाचालक जखमी झाला. एका बांधकामाच्या ठिकाणी रचलेल्या विटांच्या ढिगार्‍यात जाऊन धडकून कार जागेवरच थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. नागरिकांना मात्र पुण्यात धुमाकूळ घातलेल्या संतोष मानेची आठवण झाली.

शिरूर : शहरातून जाणार्‍या पुणे-अहमदनगर रस्त्यावर नगर परिषद प्रसूतिगृहासमोर एका मद्यपी मारुती कारचालकाने बेफामपणे कार चालवून एक रिक्षा व एका दुचाकीला धडक दिली. यात रिक्षाचालक जखमी झाला. एका बांधकामाच्या ठिकाणी रचलेल्या विटांच्या ढिगार्‍यात जाऊन धडकून कार जागेवरच थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. नागरिकांना मात्र पुण्यात धुमाकूळ घातलेल्या संतोष मानेची आठवण झाली.
शहरातून जाणारा पुणे-नगर रस्ता खूप वर्दळीचा आहे. आज साडेसातच्या सुमारास कारचालक हनुमंत रासकर (रा. पिंपळनेर) विद्याधाम प्रशालेकडून वळून सतराकमानी पुलाकडे जाणार्‍या बाजूला चालला असता, मद्यधुंद असल्याने प्रथम त्याची धडक एका रिक्षाला बसली. तेथून तो शहरात रामआळीकडे जाणार्‍या रस्त्यावर वळाला. तेथे मुळे हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या नव्या दुचाकीला त्याने उडवले. तेथून आदिनाथ क्लॉथ सेंटरसमोर असलेल्या एका विटेच्या ढिगार्‍याला जाऊन तो धडकला. तिथे उभ्या असलेल्या महिलेने अक्षरश: उडी मारली. यामुळे ती महिला बचावली. यादरम्यान नागरिकांची भिऊन पळापळ झाली. नागरिकांना संतोष माने याची आज आठवण झाली. रामआळी हा रस्ताही वर्दळीचा आहे. लहान मुलेही रस्त्यावर खेळत असतात. नागरिकांची सतत चहलपहल असते. अशात कार विटेच्या ढिगार्‍याला धडकली नसती, तर अनर्थ घडला असता. कार चालवताना चालकाच्या हातात दारूची बाटली होती व एका हाताने त्याने स्टिअरिंग धरले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. उपस्थितांपैकी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मितेश गादिया, रामा झेंडे यांनी पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

कारचा फोटो मेल केला आहे.