शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

चालकाविना सभापतींना गाड्या ! दहा गाड्या खरेदीसाठी ५३ लाखांचा खर्च

By admin | Updated: October 29, 2015 00:21 IST

सितम सोनवणे, लातूर : जिल्हा परिषदेच्या घसारा निधीतून पंचायत समितीच्या सभापतींसाठी दहा गाड्यांची खरेदी करण्यात आली. या गाड्यांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेने ५३ लाख रुपयांचा खर्च केला आहे. गाड्या खरेदी करताना शासनाच्या अटीनुसार वाहन चालकाचे नवीन पद निर्माण करण्यात येणार नाही, या अटीनुसारच वाहन खरेदी करण्यात आली. चालकाविना सभापतींना गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सितम सोनवणे, लातूर : जिल्हा परिषदेच्या घसारा निधीतून पंचायत समितीच्या सभापतींसाठी दहा गाड्यांची खरेदी करण्यात आली. या गाड्यांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेने ५३ लाख रुपयांचा खर्च केला आहे. गाड्या खरेदी करताना शासनाच्या अटीनुसार वाहन चालकाचे नवीन पद निर्माण करण्यात येणार नाही, या अटीनुसारच वाहन खरेदी करण्यात आली. चालकाविना सभापतींना गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून जिल्‘ात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. याची पूर्ण जाणीव असूनही जिल्हा परिषदेत असलेल्या निधीचा खर्च हा वाहनांवर केला जात आहे. ज्या वाहनांना चालविण्यासाठी वाहन चालकाची गरज असतानाही शासनाने वाहन चालकाचे पद निर्माण केले जाणार नाही, या अटीवर वाहन खरेदी केली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या दहाही सभापतींनी वाहन चालकाची मागणी केली आहे. या मागणीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अशी परिस्थिती असतानाही काही सभापती या गाड्या स्वत: चालवीत आहेत. तर काही सभापती पंचायत समितीच्या उपलब्ध असलेल्या चालकाकडूनकामापुरता वापर करीत आहेेत. त्यामुळे जे सभापती स्वत: गाड्या चालवीत आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. पद नसतानाही गाडी खरेदीची हौस जिल्हा परिषदेने पुरविली असली, तरी या गाड्यांचे नेमके काय करायचे, असाही प्रश्न सभापतींपुढे निर्माण झाला आहे. यासाठी पंचायत समितीच्या शेष फंडातून उपाययोजना करून कंत्राटी पद्धतीने वाहन चालकाचे पद भरले जाणार का? असाही सवाल सभापतींकडून करण्यात येत आहे. घसारा फंडातून खरेदी... घसारा फंडातून केवळ गाड्यांसाठीच ही तरतूद आहे. शासनाच्या नियमानुसारच वाहनांची खरेदी करावी लागते. त्यानुसार जिल्हा परिषदेने या वाहनांची खरेदी केली आहे. यापुढील नियोजन पंचायत समितीच्या शेष फंडातून तरतूद होऊ शकते. त्यासाठी रितसर प्रस्ताव केल्यास वाहन चालकाची व्यवस्था होऊ शकते, अशी माहिती यांत्रिकी विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांनी दिली.