शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्गात केले मद्यपान; ४ विद्यार्थिनी बडतर्फ

By admin | Updated: November 26, 2015 00:13 IST

तामिळनाडू येथील मुलींच्या उच्च माध्यमिक शाळेत गेल्या आठवड्यात विद्यार्थिनींनी वर्गातच मद्यपान करून दारूच्या नशेत परीक्षा दिल्याचे उघड झाल्यानंतर

नमक्कल (तामिळनाडू) : तामिळनाडू सरकारच्या तिरुचेनगोड येथील मुलींच्या उच्च माध्यमिक शाळेत गेल्या आठवड्यात काही विद्यार्थिनींनी वर्गातच मद्यपान करून दारूच्या नशेत परीक्षा दिल्याचे उघड झाल्यानंतर इयत्ता ११ वीच्या एकूण सात विद्यार्थिनींना शाळेतून बडतर्फ करण्यात आले.जिल्हा शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार चार विद्यार्थिनींना वर्गात दारू पिऊन परीक्षा दिल्याबद्दल आणि आणखी तीन विद्यार्थिनींना याची माहिती असूनही ती शिक्षकांना न दिल्याबद्दल शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.इंग्रजी व तामिळ माध्यमाचे इयत्ता सहावी ते १२ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या या सरकारी शाळेत २,५०० हून अधिक मुली शिक्षण घेतात. गेल्या शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. त्यानंतर दोन दिवस चौकशी झाल्यानंतर या सात विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडे त्यांचे दाखले सुपूर्द करण्यात आले. आधीच्या वेळापत्रकानुसार परीक्षा १६ नोव्हेंबर रोजी व्हायची होती; परंतु मुसळधार पावसामुळे शहरात पाणी घुसल्याने परीक्षा पुढे ढकलून ती २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. त्या दिवशी इयत्ता ११ वीच्या कॉम्प्युटर सायन्स, विज्ञान आणि बिझनेस मॅथेमॅटिक्स या विषयांची परीक्षा व्हायची होती.उपलब्ध माहितीनुसार परीक्षा स. ९.३० ची होती व मुली स. ८.३० पासून वर्गांत जमू लागल्या. शिक्षक मंडळींपैकी कोणीच त्यावेळी आलेले नव्हते. तेव्हा काही विद्यार्थिनींनी वर्गातच शीतपेयाच्या बाटल्यांमध्ये मिसळून मद्यप्राशन सुरू केले. काही मुलींनी दारू पिऊन उलट्या केल्या, काही बेशुद्ध झाल्या तर काहींनी दारूच्या नशेतच परीक्षा दिली.परीक्षेच्या पर्यवेक्षकांना वर्गात आल्यावर झाला प्रकार लक्षात आला व त्यांनी मुख्याध्यापिका कृष्णवेणी यांना माहिती दिली. त्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांचे प्रताप त्यांच्या कानावर घातले. (वृत्तसंस्था)प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांमधील दारूचे व्यसन ही घोर चिंतेची बाब असून जिल्ह्यात घडलेली अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. गेल्या वर्षी तिरुचेनगोड येथील मुलांच्या सरकारी माध्यमिक शाळेतील इयत्ता सहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी नशापान करून शाळेच्या गॅदरिंगच्या वेळी गोंधळ घातल्याने त्यांना बडतर्फ केले गेले होत