स्वत:चे नाव अंकित केलेले कपडे घालणे हे अहंकाराचे लक्षण

By Admin | Updated: January 27, 2015 23:32 IST2015-01-27T23:32:46+5:302015-01-27T23:32:46+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या स्वनामअंकित कपड्यांबाबत प्रतिक्रिया

Dressed in a person's name is a sign of ego | स्वत:चे नाव अंकित केलेले कपडे घालणे हे अहंकाराचे लक्षण

स्वत:चे नाव अंकित केलेले कपडे घालणे हे अहंकाराचे लक्षण

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या स्वनामअंकित कपड्यांबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी, तसे करणे हे अहंकाराचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. या शिखर परिषदेत मोदी यांनी घातलेल्या बंद गळ््याच्या परिधानावर नरेंद्र दामोदरदास मोदी असे अनेक ठिकाणी बारीक अक्षरात वीणकाम केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये हे वीणकाम स्पष्ट दिसल्यानंतर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या. मोदींचा कुडता हा चांगला असू शकतो मात्र बंद गळ््याचे हे परिधान फारच शरमिंदे करणारे आहे असे मत एका व्यक्तीने टिष्ट्वटरवर नोंदविले होते.

Web Title: Dressed in a person's name is a sign of ego