Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनात 'हा' पदार्थ असणार खास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:21 PM2020-02-25T15:21:22+5:302020-02-25T16:45:28+5:30

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास पारंपरिक खाद्यपदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे.

Donald Trump's India Visit dal raisina to be served to american president donald trump in rashtrapati bhawan SSS | Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनात 'हा' पदार्थ असणार खास

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनात 'हा' पदार्थ असणार खास

Next
ठळक मुद्देट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्नेहभोजन आयोजित केले आहे. दाल रायसीना असं या खास पदार्थाचं नाव असून विशेष पाहुण्यांसाठी हा पदार्थ तयार करण्यात येत आहे. 2010 साली राष्ट्रपती भवनातील तत्कालीन शेफ मछिंद्र कस्तूरे यांनी ही डिश पहिल्यांदा तयार केली.

अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं जोरदार स्वागत केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास पारंपरिक खाद्यपदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. खमन ढोकळा, कॉर्न समोसा यासह काही खास पदार्थ ट्रम्प यांच्यासाठी सोमवारी (24 फेब्रुवारी) तयार करण्यात आले होते. त्यानंतर आज ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्नेहभोजन आयोजित केले आहे. यासाठी एक खास पदार्थ तयार करण्यात येत आहे. 

दाल रायसीना असं या खास पदार्थाचं नाव असून विशेष पाहुण्यांसाठी हा पदार्थ तयार करण्यात येत आहे. 2010 साली राष्ट्रपती भवनातील तत्कालीन शेफ मछिंद्र कस्तूरे यांनी ही डिश पहिल्यांदा तयार केली. त्यानंतर ही डिश बनवण्यासाठी त्यात वेगळे-वेगळे पदार्थ वापरण्यात आले. उडीद डाळ राजमासोबत रात्रभर भिजवल्यानंतर ही डाळ तयार करण्यात येते. ही डाळ करण्यासाठी मंद आचेवर जवळपास 6-8 तास शिजवली जाते. विविध मसाले, केसर क्रिम आणि कसूरी मेथीमुळं डाळीची चव अधिक वाढते असं शेफ कस्तूरे यांनी म्हटलं आहे. 

राजकीय पाहुण्यांसाठी दाल रायसीना वाढवण्यात येते ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. राष्ट्रपती भवनात अनेक नवीन प्रयोग केले जातात. दाल रायसीना हा असाच एक प्रयोग आहे असं कस्तूरे यांनी म्हटलं आहे. तसेच दाल रायसीना बनवण्यासाठी 6-8 तासांचा अवधी लागतो असं देखील त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील सध्याचे शेफ मोंटू सैनी यांनी डाळ तयार करण्यासाठी कमीत कमी 48 तास लागतात अशी माहिती दिली आहे. मंगळवारी स्नेह भोजनानंतर ट्रम्प 10 वाजता अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतात आले असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले तेव्हा व तीन वेळा अन्य निमित्ताने दोघांची भेट झालेली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रॅपो’ हे या दौ-याच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Visit Live: भारत अमेरिकेतील संरक्षण करारावर शिक्तामोर्तब, ट्रम्प आणि मोदींची घोषणा

धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर

Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...

दंगेखोरांनी छातीवर रोखली पिस्तूल, तरीही मागे हटला नाही पोलीस कॉन्स्टेबल

 

Web Title: Donald Trump's India Visit dal raisina to be served to american president donald trump in rashtrapati bhawan SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.