Donald Trump Visit: Second day of US President Donald Trump's India Visit, donald trump news | Donald Trump Visit Live: भारताचा दौरा आटोपून डोनाल्ड ट्रम्प कुटुंबीयांसह अमेरिकेसाठी रवाना

Donald Trump Visit Live: भारताचा दौरा आटोपून डोनाल्ड ट्रम्प कुटुंबीयांसह अमेरिकेसाठी रवाना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज भारत दौऱ्याचा दुसरा दिवस होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज राष्ट्रपती भवानात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत ट्रम्प यांनी कुटुंबीयांसह स्नेहभोजन केल्यानंतर अमेरिकेला परत जाण्यासाठी निघाले आहे.

 

LIVE

Get Latest Updates

10:17 PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत स्नेहभोजन केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प अमेरिकेत परत जाण्यासाठी निघाले, ट्रम्प कुटुंबीयांना निरोप देण्यासाठी मोदीसुद्धा उपस्थित

07:46 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सपत्नीक राष्ट्रपती भवनात दाखल झाले असून, त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. 

06:09 PM

काश्मीरच्या मुद्द्यावर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे. काश्मीर हा बराच काळ लोकांच्या दृष्टीने न सुटलेला विषय आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.आम्ही आज दहशतवादावर चर्चा केली आहे़- डोनाल्ड ट्रम्प 

05:04 PM

भारतात येणे हा माझ्यासाठी एक सन्मान झाला आहे. मोदी एक स्पेशल पंतप्रधान आहेत, ते काय करीत आहेत हे त्यांना माहीत आहे. ते एक कणखर माणूस आहेत. त्यांनी विलक्षण काम केलेले आहे- डोनाल्ड ट्रम्प 

02:38 PM

दिल्लीतील शालेय विद्यार्थ्यांनी मेलेनिया ट्रम्प यांना भेट दिले मधुबनी पेंटिंग्स

01:56 PM

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची संयुक्त पत्रकार परिषद

01:55 PM

भारतात झालेले स्वागत आणि आदरातिथ्य आमच्या कायम स्मरणात राहील - डोनाल्ड ट्रम्प

01:54 PM

दोन्ही देशांच्या व्यापार मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली, व्यापारी चर्चेला कायदेशीर स्वरूप देण्याचा निर्णय - नरेंद्र मोदी

 

01:52 PM

दहशतवाद रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका संयुक्तपणे प्रयत्न करतील - नरेंद्र मोदी

01:50 PM

आजच्या बैठकीत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा झाली

01:42 PM

मेलेलिना ट्रम्प यांनी घेतली विद्यार्थ्यांची गळाभेट

01:10 PM

मेलेनिया ट्रम्प यांच्या स्वागतप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले विविध सांस्कृतिक कार्यक्रम

01:10 PM

मेलेनिया ट्रम्प यांचे शालेय विद्यार्थ्यांनी पुष्पहार घालून केले स्वागत

01:08 PM

डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनी दिली दिल्लीतील शाळेला भेट

01:07 PM

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये झाली औपचारिक चर्चा

11:22 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी हैदराबाद हाऊस येथे घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

11:07 AM

राजघाट येथे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांनी केले वृक्षारोपन

10:49 AM

राजघाट येथील महात्मा गांधींच्या समाधीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी वाहिले पुष्पचक्र

10:44 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

10:36 AM

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपती भवनातील भेटीची क्षणचित्रे

10:30 AM

गार्ड ऑफ हॉनरही पाहणी करताना डोनाल्ड ट्रम्प

10:29 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपती भवनात देण्यात आला गार्ड ऑफ हॉनर

10:28 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती भवनात घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

Web Title: Donald Trump Visit: Second day of US President Donald Trump's India Visit, donald trump news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.