धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 01:43 PM2020-02-25T13:43:18+5:302020-02-25T14:23:08+5:30

दिल्ली-लखनऊ महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हा तब्बल 12 तास महामार्गावर पडून होता

Uttar Pradesh Vehicles run over accident victim for 12 hours on Delhi-Lucknow highway in Amroha SSS | धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...

धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...

googlenewsNext
ठळक मुद्देगजरौलाजवळ दिल्ली-लखनऊ हायवेवर एक भीषण अपघात झाला. मृतदेह हा तब्बल 12 तास हायवेवर पडून होता आणि त्याचदरम्यान हजारो गाड्या मृतदेहावरून गेल्या. मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमरोहा - अपघाताच्या घटना या वारंवार घडत असतात. अनेकदा रस्त्यावर अपघात घडतो तेव्हा लोक मदतीचा हात देण्याऐवजी त्याचे फोटो अथवा व्हिडीओ काढतात. तर काही वेळा वेळ नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातात. अशीच एक घटना धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये घडली आहे. गजरौलाजवळ दिल्ली-लखनऊ हायवेवर एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हा तब्बल 12 तास हायवेवर पडून होता आणि त्याचदरम्यान हजारो गाड्या मृतदेहावरून गेल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-लखनऊ हायवेवर रस्ता ओलांडताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तब्बल 12 तास मृतदेह हा हायवेवर पडून होता. कारण कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. याच दरम्यान हजारो गाड्या या मृतदेहावरून गेल्या असल्याने मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. तब्बल 13 तासांनी पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत मृतदेहाचे अनेक तुकडे झाले असून ते रस्त्यावर सर्वत्र पडले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची अवस्था खूप वाईट आहे. असंख्य तुकडे झाले असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटवणं कठीण आहे. घटनास्थळावरील मृतदेहाचे तुकडे एकत्र करण्यात आले आहेत. अपघाताच्या ठिकाणी एक जॅकेट सापडले आहे. मात्र त्यामध्ये कोणतेही ओळखपत्र अथवा माहिती मिळेल असं काही सापडलं नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेहाचे तुकडे पाठवण्यात आले. डीएनएच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर देखील असाच भीषण अपघात झाला होता. कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जवळपास 60 वाहने त्याच्या मृतदेहावरून गेली. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे एकत्र केले तसेच ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मृत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रातून त्याची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर

Delhi Violence: बंदुकधारी तरुण भाजपा समर्थक नाहीच, जाणून घ्या सत्य

Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...

दंगेखोरांनी छातीवर रोखली पिस्तूल, तरीही मागे हटला नाही पोलीस कॉन्स्टेबल

'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द

 

Web Title: Uttar Pradesh Vehicles run over accident victim for 12 hours on Delhi-Lucknow highway in Amroha SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.