मुलं विचारत नाहीत म्हणून वयाच्या नव्वदीला लग्नाचा घाट

By Admin | Updated: January 11, 2016 13:14 IST2016-01-11T13:14:35+5:302016-01-11T13:14:35+5:30

वयाची नव्वदी पूर्ण केलेल्या एका गुजराती गृहस्थाने लग्न करण्याचा घाट घातला आहे.

Do not ask kids as they are in the ninth quadrangle | मुलं विचारत नाहीत म्हणून वयाच्या नव्वदीला लग्नाचा घाट

मुलं विचारत नाहीत म्हणून वयाच्या नव्वदीला लग्नाचा घाट

>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ११ - वयाची नव्वदी पूर्ण केलेल्या एका गुजराती गृहस्थाने लग्न करण्याचा घाट घातला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार निवृत्तीनंतर २५ वर्षांनी या गृहस्थाच्या पत्नीचा मृत्यू झाला. दोन मुले व दोन मुली असलेला या गृहस्थाची हयात बँकिग क्षेत्रात गेली असून सध्या ते मुलीकडे राहतात आणि तिला १८ हजार रुपये घरभाडे देतात, तर जेवण्याचे ६ हजार रुपये ते एका मुलाला देतात.
माझ्या मुलांना केवळ माझ्या संपत्तीत रस असल्याने उर्वरीत आयुष्य मजेत जगण्यासाठी मला सहकारी होऊ शकेल अशा पत्नीची गरज असल्याचे मत या व्यक्तिने व्यक्त केले आहे. त्यासाठी या गृहस्थाने धर्मादाय संस्थांशी संपर्क साधला असून कुठल्याही वयाची अनुरूप पत्नी सुचवण्याचे आवाहन केले आहे. 
या गृहस्थाने पत्नी मिळावी यासाठी आमच्याकडे संपर्क साधला असल्याचे विनामूल्य अमूल्य सेवा या संस्थेच्या नातुबाई पटेल यांनी सांगितल्याचे टाइम्सने म्हटले आहे.

Web Title: Do not ask kids as they are in the ninth quadrangle